Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; देशात 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण - Maharashtra 24

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; देशात 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि.२० एप्रिल । नवीदिल्ली । देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत लसीकरणासंबंधी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 18 वर्षांवरील सर्व जण 1 मे पासून लसीकरणासाठी पात्र ठरणार आहेत. आज हा मोठा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

आज डॉक्टर, टास्क फोर्स आणि औषध निर्मिती कंपन्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बैठक घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. भारतीयांना जास्तीत जास्त आणि कमीत कमी वेळेत लस दिली जावी यासाठी केंद्र सरकार मागील एक वर्षापासून प्रयत्न करत आहे. लसीकरण देशात वेगाने सुरु आहे, पुढेही ही गती कायम राहणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

कोरोनाची लस सर्वांना दिली जावी अशी, मागणी देशभरातून केली जात आहे. लसीकरणाचा हा तिसरा टप्पा असणार आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात फ्रन्टलाईन वर्कर्स आणि 60 वर्षांवरील नागरिकांचा समावेश होता. तर दुसऱ्या टप्यात 45 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *