Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
रोज केवळ दोन खजूर खा, आरोग्यासाठी खूप फायदेशीर - Maharashtra 24

रोज केवळ दोन खजूर खा, आरोग्यासाठी खूप फायदेशीर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि.२१ एप्रिल । पुणे ।

निरोगी हृदयासाठी
आयुर्वेदानुसार, खजूर एक चमत्कारी औषध असून यामुळे अनेक रोगांवर उपाय केले जातात. शारिरीक कमजोरी, शरीरात रक्ताची कमी किंवा हृदयरोग, जास्त तहान लागण्याची समय्या या सर्वांवर खजूर तुम्हाला मदत करु शकतो.

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर
वजन कमी करण्यासाठी खजूर अत्यंत फायदेशीर आहे. विशेष म्हणजे पोटावरची चरबी कमी करण्यासाठी खजूरचे सेवन केले पाहिजे.

हाडे मजबूत बनवते
खजूरामध्ये फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असते. हे हाडांसाठी फायदेशीर आहे, जे हाडे मजबूत करण्यास मदत करते. तसेच हाडांशी संबंधित समस्यांना देखील यामुळे कमी होतात.

डोळ्यांसाठी फायदेशीर
दररोज खजूर खाणे डोळ्यांसाठी चांगले आहे. खजुरामध्ये व्हिटॅमिन ए असते जे डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. यामुळे ज्यांना डोळ्यांसंबंधीत काही त्रास आहे अशांनी खजूर खाल्ल्ये पाहिजे.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते
खजूरमध्ये फ्लेव्होनॉइड्स, कॅरोटीनोईड्स, फिनोलिक अॅसिड असतात. ज्यामुळे शरीराची प्रतिकार शक्ती वाढते. खजूरमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात, ज्यामुळे आपल्या त्वचेला फायदा होतो.

केस आणि त्वचेसाठी फायदेशीर
खजूरमध्ये व्हिटॅमिन ई असते. जे केसांना निरोगी आणि वाढण्यास मदत करते. खजूरमध्ये व्हिटॅमिन सी आणि डी देखील असते. यामुळे त्वचा चांगली होण्यास मदत होते.

(टीप : वरील माहिती ही सामान्य माहितीवर आधारित आहे. आपण आहाराबद्दल तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *