महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि.२० एप्रिल । मुंबई । महाराष्ट्रात कोरोनाची (maharashtra corona cases) परिस्थिती बिकट होत असल्यामुळे राज्यात संपूर्णपणे लॉकडाऊन (maharashtra Lockdown) लागू होण्याची शक्यता आहे. याबद्दल राज्य सरकारची पूर्ण तयारी झाली आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) ‘लॉकडाऊन लागू करण्याबद्दल राज्य सरकारला लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय म्हणून निवडा’ असा सल्ला दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन जनतेशी संवाद साधला आहे. लॉकडाऊन हा आता शेवटचा पर्याय असेल अशी स्पष्ट भूमिका पंतप्रधानांनी बोलून दाखवली आहे.’मागील वर्षी आपण लॉकडाऊन लावला होता, त्यावेळी अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यामुळे यावेळी देशाला लॉकडाऊन पासून वाचवायचं आहे, राज्य सरकारने सुद्धा लॉकडाऊनचा पर्याय हा शेवटचा पर्याय म्हणूनच निवडला पाहिजे’, असं आवाहनही मोदींनी केले.
‘या संकटाच्या वातावरणात गरजू लोकांना मदत करण्यासाठी पुढ यावे, लोकांच्या मदतीतून आपण कोरोनावर मात करू शकतो. तरुणांनी आपल्या सोसायट्यांमध्ये येऊन समिती स्थापन करून कोरोनाचे नियम पाळण्याबद्दल जागृकता करावी. जर आपण सर्वांनी नियम पाळले तर लॉकडाऊनची गरजच पडणार नाही’, असंही मोदी म्हणाले.
‘आता 18 वर्षांपुढील व्यक्तींना कोरोनाची लस दिली जाणार आहे. भारतात जी लस तयार केली जाईल, त्याचा हिस्सा हा राज्य आणि रुग्णालयांना मिळणार आहे. 45 वर्षांवरील लोकांना लस देण्याचे काम सुरू आहे. त्यांनाही लस देण्याची मोहीम सुरूच राहणार आहे’, असंही मोदींनी स्पष्ट केले.