महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि.21 एप्रिल । मुंबई । भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (Reliance Industries Ltd.) कोरोनाच्या संकटात (Corona Pandemic) देशाच्या मदतीला धावून आली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आपल्या जामनगर ऑईल रिफायनरी (Jamnagar refineries)मध्ये दररोज 700 टनहून अधिक वैद्यकीय ऑक्सिजन तयार करत (produce over 700 tones medical oxygen per day) आहे. हे ऑक्सिजन कोविड-19 मुळे सर्वाधिक प्रभावित असलेल्या आणि ऑक्सिजनचा तुटवडा असलेल्या राज्यांना विनाशुल्क म्हणजेच मोफत देण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची मागणी होत आहे. ऑक्सिजनचा वापर लक्षात घेता रिलायन्सने अधिक ऑक्सिजन निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी रिलायन्स कंपनीला आपल्या उत्पादन पद्धतीत बदल करावा लागला आहे. गुजरातमधील कंपनीच्या जामनगर रिफायनरीत सुरुवातीला 100 टन वैद्यकीय ऑक्सिजनची निर्मिती केली जात होती. मात्र, आता ही निर्मिती वाढवून 700 टन करण्यात आली आहे.
कोरोना संक्रमणाने सर्वाधिक प्रभावित असलेल्या महाराष्ट्र, गुजरात आणि मध्यप्रदेश यासारख्या राज्यांना पुरवल्या जाणाऱ्या या ऑक्सिजनच्या पुरवठ्यामुळे दररोज 70,000 हून अधिक गंभीर रुग्णांना त्यामुळे दिलासा मिळेल. लवकरच कंपनीकडून मेडिकल ग्रेडच्या ऑक्सिजनचे उत्पादन वाढवून 1000 टन करण्याची योजना आखत आहे.