महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी ; संजीवकुमार गायकवाड । दि.२२ एप्रिल। नांदेड ।
सरपंच सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित
जिल्यातील धर्माबाद येथील माजी नगरसेवक यांचा अनोख्या उपक्रमामुळे हिंदू मुस्लिम एक्याचे दर्शन घडत आहे.आज भारतात कडवी विधाने करून काही राजकीय नेते मंडळी देशातील हिंदू-मुस्लिम ऐक्याला तडा देण्याचे काम करत असून त्याला उत्तर म्हणजे आपल्या महामानवांच्या शिकवणीनुसार चालून गोरगरीब जनतेची सेवा करण्यासाठी पुढे सरसावले.
त्यांनी धर्माबाद शहरातील मुस्लिम समाजातील युवकांनी समीरभाई (माजीद अहेमद शब्बीर अहेमद)यांच्या पुढाकारातून समीरभाई मित्र मंडळ या संस्थेच्या माध्यमातून मालेगाव चा मंसुरी काढा पाजून उपक्रम राबविले यातून आणखी काही धर्माच्या पलीकडे जाऊन करण्याच्या उद्देशाने त्यांनी समीर भाई मित्र मंडळ या संस्थेच्या माध्यमातून धर्म कोणताही असो जात कोणती येतो क्रोना बाधित पार्थिवावर अंतिम संस्कार करण्याचे काम सुरू केले.
व अशा लोकांना खांदा देण्याचे काम समीर अहमद यांनी समीर भाई मित्र मंडळ यांच्या माध्यमातून सुरू केल असून कोरोना संसर्गजन्य आजारामुळे मृत्युमुखी पडलेल्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करणे हा मोठा अडचणीचा विषय सर्वासमोर उपस्थित राहिला असून या परिवाराचे सदस्य कोरोनाच्या आजारामुळे मृत्युमुखी पडला बहुतेक ठिकाणी त्या परिवारातील सदस्यांना त्या मृतदेहा पासून दूरच राहणे पसंत केले मात्र त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कोणी करावं हे प्रश्न अनेकांच्या समोर उपस्थित राहिला असता धर्माबाद शहरातील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर राहणाऱ्या माजी नगरसेवक समीर भाई यांच्या संकल्पने तुन समीरभाई मित्र मंडळ च्या वतीने धर्माबाद येथे कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या अंतिम संस्कार करण्यासाठी पुढाकार घेऊन त्या समीर भाई मित्र मंडळाच्या या सदस्यानी त्याची ना जात पाहिली ना धर्म मुस्लिम असो की हिंदू आदी धर्मातील कोरोना मुळे निधन झालेल्या ज्याच्या त्यांच्या रीतीरिवाजा नुसार धार्मिकअंतिम संस्कार केले.
समीर भाई मित्र मंडळाचे सदस्य समीर अहमद,शेख अन्सार चिकनेकर,सय्यद सद्दाम,सिकंदर भाई,कलीम भाई,मोहम्मद एकबाल,मोहम्मद उमर,बाईक झोन चे मालक शेख एजाज,त्यांच्या सोबत साथ देणारे छोटू पाटील बाबळीकर मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष,पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते ऍम्ब्युलन्स चे मालक भगवान कांबळे,महमद ताज्जोद्दीन करखेलिकर, व टीमचे जिल्ह्यात कौतुक करीत आहेत.
अशा काही घटनांमुळे पुन्हा एकदा हिंदू मुस्लीम ऐक्याचे दर्शन घडत आहे त्यांच्या या कार्याला सर्वत्र कौतुक होत आहे.
यामुळे समीर भाई यांच्या करण्याचा सरपंच सेवा संघाचे संस्थापक तथा राज्य सरचिटणीस बाबासाहेब पावशे यांनी समीर भाई यांना कोविड योद्धा प्रमाणपत्र देऊन त्यांच्या व सोबत च्या तुमचा गौरव केला त्यांना ह्या पुरस्कार मिळाला म्हणून अनेकांनी त्यांच्या पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा पण दिल्या आहेत.