महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी ; संजीवकुमार गायकवाड । दि.२२ एप्रिल। नांदेड ।धर्माबाद येथील राम मंदिर प्रांगणात मर्यादापुरुषोत्तम प्रभू श्रीरामचंद्र जन्मोत्सव सोहळा कोरोना महामारीचे सर्व नियम पाळून अत्यन्त साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.यावेळी प्रभू श्रीरामाचे नामस्मरण करून प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत वंदन करण्यात आले.
दरवर्षी धर्माबाद शहरात मोठ्या हर्षोल्हासात प्रभूश्रीराम जयन्ती साजरी केली जाते.तसेच शहरातील मुख्य रस्त्याने भव्य रैली राम,सीता,लक्ष्मण,हनुमान अशी झांकी काढून शहरवासीयांचे लक्ष वेधले जायचं तसेच रक्तदान सारखे कार्यक्रम घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासली जायची.तर येथील श्रीराम मंदिरात महिला मंडळींकडून भजन,श्रीरामस्रोत पठण करून रामजन्मोत्सव साजरा व्हायचा.यावेळी ठिकठिकाणी महाप्रसाद,रैलीचे सडा संमार्जन,रांगोळी व भगव्या पताका लावून स्वागत केले जात होते.मात्र यंदा कोरोना महामारीने उग्ररूप धारण केल्याने सण, उत्सव,मंदिर,मस्जिद आदींसह सर्व धार्मिक स्थळे बंद असल्याने हिंदू धर्मियांना उत्सव आपापल्या घरी साजरा करावा लागतो आहे. तर युवकांना आपल्या आनंदावर पाणी फिरावे लागले आहे.धर्माबाद शहरातील शास्त्रीनगर परिसरात प्रभू श्रीरामाची मूर्ती स्थापन करून गेली अनेक वर्षा पासून मंदिर परिसराची साफ सफाई करून पाणी शिपडून रोज पूजा अर्चा करण्यात येत असते आज अगदी साध्या पद्धतीने राम नवमी साजरी केली आहे.आज सुरज स्वामी महाराज यांच्या हस्ते महापूजा करून लिगांणा गोस्कुलवाड यांच्या हस्ते ध्वज पताकाचे अनावरान करण्यात आले आहे.यावेळी लक्षिमन गड्डाड,सिनु दासरवा,यादव डाकरे बाभळीकर,सुनील सुरेवंशी,अनिल पाटील,आदी जण उपस्थित होते.