बजाजने आपल्या चेतकची किंमत वाढली

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि.२२ एप्रिल। पुणे ।ऑटो क्षेत्रातील दुचाकी निर्मिती कंपनी बजाजने आपल्या चेतक स्कुटरची किंमत वाढवण्याची घोषणा केली आहे. कंपनी सध्या या दुचाकी देशभरातील ठराविक शहरात विक्रीकरीता उपलब्ध करते आहे. सध्याला आधीच्या किंमतीच्या तुलनेत या गाडीच्या खरेदीकरीता ग्राहकांना आता 27 हजार रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. वाढलेल्या किंमतीसह आता स्कुटरची किमत 1 लाख 42 हजार 620 रुपये (पुणे) होणार आहे. याआधी मार्च 2021 मध्ये गाडीची किंमत 5 हजाराने वाढली होती. मागच्या वर्षी सदरची दुचाकी कंपनीने सादर केली होती. कंपनीचे देशात एकूण 18 विक्रेते आहेत. पुण्यात 5 आणि बेंगळूरात 13 विक्रेते असल्याचे कंपनीने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *