टाळेबंदीत घरबसल्या करु शकता बँकेची सर्व काम

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पुणे । दि.२२ एप्रिल । देशासह अनेक राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून आवश्यक ती पावलं उचलली जात आहेत. बँक, त्याच्या विविध शाखा, बँकेतील कर्मचारी हे अत्यावश्यक सेवेत येत आहेत. त्यामुळे बँका बंद करणे शक्य नाही. पण बँकेतील कर्मचारी आणि ग्राहकांना कोरोनाचा धोका टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण पावलं उचलली जात आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व ग्राहकांनी त्यांची कामे ऑनलाईन किंवा अ‍ॅपद्वारे करावी, असे आवाहन केले आहे. (Many Banks Provide service via digital mode)

बँकेत न जाण्याचे अनेक पर्याय
सध्या ग्राहकांना मिस कॉल बँकिंग, व्हॉट्सअ‍ॅप बँकिंग, मोबाईल अ‍ॅप आणि एटीएमसारख्या अनेक प्रकारच्या बँकिंग सेवांचा लाभ घेण्याची संधी आहे. यामुळे तुमचा बँक किंवा त्यातील कर्मचाऱ्यांशी संबंध येणार नाही. तसेच तुम्हाला त्यांना वारंवार भेटावेही लागणार नाही. त्यामुळे कोरोनाचा धोका टळू शकतो.

वृद्धांसाठी खास सुविधा

अनेक वृद्धांकडे स्मार्टफोन नसतात. त्यामुळे त्यांच्यासाठी बँकेने Door step banking चा पर्याय दिला आहे. यात वृद्ध ग्राहकांना बँकेकडून खास सुविधा दिली जाते. ज्यात रोख रक्कम काढण्यापासून पैसे डिपॉझिट करण्यापर्यंत सर्व सुविधा तुम्हाला घरबसल्या मिळतात. यासाठी तुम्हाला फक्त बँकेला एक फोन करावा लागतो.

कोरोनामुळे बहुतांश सेवेत घट

गेल्यावर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे अनेक बँकांनी त्यांच्या बहुतांश सेवा कमी केल्या होत्या. त्यामुळे फार कमी ग्राहक बँकांच्या शाखेत कामासाठी दाखल झाले होते. HDFC या बँकेने गेल्यावर्षी 2020 मध्ये कामकाजाचा वेळ कमी केला होता. तसेच परदेशी चलनाची विक्रीही बंद केली होती. तर दुसरीकडे भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाने लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात नवीन खाते उघडणे, रोख रक्कम काढणे, पासबुक प्रिंटींग आणि चलन विनिमय यासारख्या सेवा बंद केल्या होत्या. (Many Banks Provide service via digital mode)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *