IPL 2021: पुणेकर ऋतुराज गायकवाड ने 3 मॅचमध्ये फ्लॉप झाल्यानंतरही धोनीचा विश्वास सार्थ ठरवला

Spread the love

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पुणे । दि.२२ एप्रिल ।चेन्नई सुपर किंग्सनं (Chennai Super Kings) बुधवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) 18 रननं पराभव केला. या मॅचमध्ये चेन्नईनं पहिल्यांदा बॅटींग करत 3 आऊट 220 रन केले. कोलकातानं याचा जोरदार प्रतिकार केला. पण त्यांची टीम 202 रन काढून ऑल आऊट झाली. चेन्नईचा हा स्पर्धेतील सलग तिसरा विजय आहे.

अनुभवी फाफ ड्यू प्लेसिस (Faf du Plessis) आणि पुणेकर ऋतुराज गायकवाड (Rururaj Gaikwad) यांचं अर्धशतक हे चेन्नईच्या इनिंगचं वैशिष्ट्य ठरलं. ड्यू प्लेसिसनं 60 बॉलमध्ये नाबाद 95 रन काढले. तर ऋतुराजनं 42 बॉलमध्ये 6 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीनं 64 रनची खेळी केली.

ऋतुराज या आयपीएलमधील (IPL 2021) पहिल्या 3 मॅचमध्ये अपयशी ठरला होता. त्यानं पहिल्या 3 मॅचमध्ये फक्त 20 रन केले होते. ऋतुराजचा फॉर्म हा काळजीचा विषय होता. त्याला काढण्याची काही क्रिकेट फॅन्सनी मागणी देखील केली होती. त्यानंतरही सीएसकेच्या मॅनेजमेंटनं त्याच्यावर विश्वास कायम ठेवला. ऋतुराज सलग 3 मॅचमध्ये फ्लॉप होऊनही त्याला पुन्हा संधी का मिळाली? या प्रश्नाचं उत्तर सीएसकेचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनीनं (MS Dhoni) दिलं आहे.

चेन्नईच्या विजयानंतर धोनीनं ऋतुराजला पुन्हा संधी का दिली याचं कारण सांगितलं आहे. ” ऋतुराजनं मागच्या आयपीएलमध्ये चांगला खेळ केला होता. बॅटींगनंतर मी त्याला ‘आज कसं वाटतंय?’ असा प्रश्न विचारला होता. एखाद्याला हा प्रश्न विचारल्यानंतर त्याच्या उत्तराची तुम्हाला अपेक्षा असते. त्यावेळी त्याच्या डोळ्यात काय चाललंय हे तुम्ही पाहता. ऋतुराजची प्रतिक्रिया ऐकल्यानंतर तो अधिक काळजीमध्ये नाही, हे माझ्या लक्षात आलं,” असं धोनीनं स्पष्ट केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *