Gold Price Today: ; 2 महिन्यात सोन्याच्या किमतीत मोठी वाढ; पहा आजचे दर

Spread the love

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि.२२ एप्रिल ।. भारतात कोरोनाचं संकट पुन्हा एकदा वाढत आहे. अशात गुंतणुकदार पुन्हा एकदा सोन्याच्या खरेदीकडे वळताना दिसत आहेत. याच कारणामुळे मागील काही दिवसात सोन्याच्या किमतीत वाढ नोंदवली गेली आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सोन्याच्या किमती वाढण्यास अनेक घटक कारणीभूत आहेत. यामुळे पुढील काही दिवसात सोन्याच्या किमतीत तेजी पाहायला मिळू शकते.फेब्रुवारीमध्ये सोन्याचा दर 45,600 रुपये प्रति दहा ग्रॅम होते. आता हे दर 48,000 रुपयांहून अधिक झाले आहेत. मागील दोन दिवसांत देशातील बाजारात सोन्याच्या किमतीत वाढ नोंदवली गेली आहे. सध्या तरी आज सोन्याच्या किमतीत किरकोळ घट झाल्याचं पाहायला मिळालं आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचे दर उच्चांकावर म्हणजेच 56 हजार 200 रुपयांवर पोहोचले होते.

दोन दिवसांच्या वाढीनंतर आज सोन्याच्या भावात किरकोळ घट झाली आहे. गुरुवारी एमसीएक्स (MCX) वर सोन्याच्या वायद्यात 0.04% टक्क्यांची घट झाली आहे. सोन्याचे नवे दर आता 48,210 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहेत.

चांदीचे दर –
चांदीच्या किमतीतही (Silver Price) आज घट झाल्याचं पाहायला मिळालं आहे. सराफा बाजारात गुरुवारी चांदीचा वायदा 0.05% टक्क्यांनी खाली आला असून दर 70,304 रुपये प्रतिकिलोवर आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *