सकारात्मक विचारांनी 105 वयमान असणाऱ्या जिगरबाज आजोबांची कोरोनाला धोबीपछाड,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि.२३ एप्रिल। लातूर ।लातूरमधून (Latur news) एक चांगली बातमी आली आहे. जिल्ह्यातल्या औसा तालुक्यात लोदगा गावातील 105 वर्षाच्या आजोबांनी कोरोनाला अवघ्या सात दिवसांत (105 year old man defeated corona) धोबीपछाड दिली आहे. सकारात्मकता (Positive news corona) आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी कोरोनाविरोधातला हा लढा (Covid warrior) सहज जिंकला.

लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यामध्ये लोदगा हे गाव आहे. या गावात अंधारे कुटुंबामध्ये धोंडीराम अंधारे हे 105 वर्षे वयाचे आजोबा आहेत. गेल्या आठवड्यामध्ये कोरोनाच्या राक्षसानं या आजोबांनाही गाठलं. धोंडीराम यांना खोकला, ताप आणि दम लागणं अशी काही लक्षणं दिसून आली. त्यामुळं डॉक्टरांच्या सल्ल्याने कुटुंबीयांनी त्यांची कोरोना चाचणी केली. शेवटी ज्याची भीती होती तेच झालं. आजोबांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आजोबांना कोरोना झाल्यानं सगळ्यांचेच धाबे दणाणले होते. त्यामुळं लातूरच्या खासगी रुग्णालयात आजोबांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पण सगळे घाबरलेले असतानाच आजोबा मात्र प्रचंड सकारात्मक असल्याचं पाहायला मिळत होतं. 105 वर्षांच्या आयुष्यात अनेक मोठ्या संकटाचा सामना करत त्यांनी परिस्थितीवर मात केली होती. त्यामुळं आपल्याला काही होणार नाही असा आत्मविश्वास त्यांना होता.

सात दिवसानंतर आजोबांची दुसऱ्यांदा कोरोना तपासणी झाली त्यावेळी त्यांची टेस्ट निगेटिव्ह आली. विशेष म्हणजे आठ सदस्य असलेलं अंधारे यांचं सपूर्ण कुटुंबच कोरोनाशी लढा देत होतं. पण या जिगरबाद आजोबांच्या प्रेरणेनं त्यांच्यासह संपूर्ण कुटुंब ठणठणीत झालं. तरुणालाही लाजवेल अशा धैर्यानं आजोबांनी कोरोनाला हरवलं. त्यामुळं ग्रामस्थांनादेखील त्यांचा अभिमान व कौतुक वाटलं नाही तरच नवल. अशाच सकारात्मकतेनं या संकाटाला सामोरं गेल्यास त्याला पराभूत करणं आणखी सोपं होईल हेच यावरून स्पष्ट होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *