महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि.२३ एप्रिल। पुणे । गेल्यावर्षी पुण्यात कोविडची पहिली लाट आल्यानंतर विप्रो कंपनीनं सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून पुणे जिल्हा परिषदेला सीएसआर फंडातून 450 बेड्सचं हे अद्ययावत कोविड हॉस्पीटल उभारून दिलंय यामध्ये 10 व्हेंटीलेटर बेड्स तर 200 ऑक्सीजन बेड्स आहेत. ग्रामीण भागातील गोरगरिब रूग्णांना या विप्रो कोविड सेंटरमध्ये आजही पूर्णत: मोफत उपचार दिले जातात. रूग्णालयाची देखभाल, जेवणाचा खर्च हा विप्रो कंपनीमार्फत केला जातो तर मेडीकल स्टाफ हा पुणे झेडपीमार्फत उपलब्ध करून देण्यात आलाय तसंच रोजचा वैद्यकीय खर्चही शासनामार्फत केला जातो, अशी माहिती पुणे झेडपीची सीईओ आयुष प्रसाद यांनी दिली. या रूग्णालयातून आजवर तब्बल 4 हजाराच्या पेशंट्स कोरोनामुक्त होऊन घरी गेलेत, तसंच मृत्यूदर कमी राखण्याचं सर्व श्रेय हे इथल्या वैद्यकीय स्टाफला जात असल्याचं झेडपी सीईओ यांनी सांगितलं.
ऑक्सिजन आणि रेमडीसीवरच्या तुटवड्यामुळे कोरोना रूग्णांच्या मृत्यूदरात एकीकडे प्रचंड वाढ होत असतानाच दुसरीकडे हिंजवडीतील विप्रो कोविड केअर सेंटरमध्ये मात्र आत्तापर्यंत अवघ्या 6 रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. थोडक्यात या अद्ययावत कोविड केअर सेंटरचा मृत्यूदर अवघा 0.1 टक्के इतका न्यूनतम राखण्यात इथल्या डॉक्टरांना यश आलंय. डॉ. बालाजी लकडे यांनी ही माहिती एका वृत्तवाहिनीला दिली.
डॉ. बालाजी लकडे यांच्याकडे हे या विप्रो कोविड सेंटर्सचं दैनंदिन कामकाज सांभाळतात, ते म्हणाले, ” आम्ही इथं रूग्णांवर फक्त उपचारच करत नाहीतर त्यांची मानसिक स्थिती प्रसन्न कशी राहिल, त्यांना सकस आहार कसा मिळेल याचीही काळजी घेतो, त्यामुळे पेशंट्स लवकर बरे होतात, सध्या ऑक्सीजनची थोडीसी कमतरता जाणवत असली तरी आम्ही रूग्णांच्या प्रकृतीवर कोणताही परिणाम होऊ दिला नाही, प्रसंगी बाहेरून सिलेंडर आणले. त्यामुळेच इथला मृत्यूदर सर्वात कमी नोंदवला गेला आहे.”
विप्रो कोविड सेंटरची रूग्णसेवा
सर्वात कमी मृत्यूदर… 0.1%
Total Admission – 5041
Total Discharge -4506
Total Referred – 120
Total Death – 06
Death rate – 0.1 %