सकारात्मक बातमी ; पुण्यात नव्या Covid रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि.२३ एप्रिल। पुणे । पुण्यात एक सराकारात्मक बातमी समोर आली आहे. गेल्या 6 दिवसात शहरात नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. आजपासून लॉकडाऊन (Strict Lockdown) अधिक कडक असल्याने येत्या काही दिवसात ही संख्या अधिक कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (More recoveries than new Covid patients in pune)

गेल्या आठवड्यापासून पुण्यात कोरोनाबाधिकांच्या संख्येत बरीच घट पाहायला मिळत आहे. आरोग्य विभागाकडून आलेल्या माहितीनुसार 16 ते 21 एप्रिल या दरम्यान शहरात सुमारे 27 हजार 694 रुग्ण सापडले असून बरे झालेल्यांची संख्या 35 हजार 175 इतकी आहे.

बरे होणाऱ्यांची संख्या अधिक…

19 एप्रिल – नवीन रुग्ण 4587 – बरे झालेले 6473

20 एप्रिल – नवीन रुग्ण 5138 – बरे झालेले 6802

21 एप्रिल – नवीन रुग्ण 5529 – बरे झालेले 6530

22 एप्रिल – नवीन रुग्ण 4539 – बरे झालेले 4851

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *