आमदार अण्णा बनसोडे यांच्या निधीतून वाय सी एम हॉस्पिटला सी टी स्कॅन मशीन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि.२३ एप्रिल। पिंपरी । सुमारे १ कोटी 30 लाख रुपये किंमत असलेले सी टी स्कॅन मशीन यशवंतराव चव्हाण स्मृति रुग्णालय (YCM हॉस्पिटल ) या ठिकाणी बसविण्यासाठीचा प्रस्ताव आमदार अण्णा बनसोडे यांनी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याकडे दिला असून covid – 19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने प्रतेक विधान सभा सदस्याला एक कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे. या निधीचा वापर शहरातील कोविड ग्रस्त रुग्णांना व इतर रुग्णांना कायम स्वरूपी व्हावा, अशा दूर दृष्टीने आमदार बनसोडे यांनी तातडीची गरज ओळखून या कामासाठी निधी दिला असून तात्कळ मशीन खरेदी करण्याच्या सूचना प्रशानास दिल्या आहेत.

कोरोना ग्रस्त रुग्णांची फुप्फुसे किती संक्रमित आहेत याचे अचूक मोजमाप CT स्कॅन मशीनद्वारे करण्यात येते रुग्णाचा HRCT स्कोर किती आहे त्याप्रमाणे तज्ञ डॉक्टर रुग्णावर औषध उपचार करतात. कोरोना अर्थात कोविड -19 हा विषाणू रुग्णाच्या फुफ्फुसावर आक्रमण करतो व निमोनिया वाढल्याने रुग्णास श्वास घेण्यास त्रास होतो परिणामी रुग्णाच्या शरीरातील प्राणवायूचे प्रमाण कमी होऊ लागते. पातळी खालावल्यामुळे रुग्ण आत्यावस्त होते. म्हणून रुग्णाचे फुफ्फुस कितीं संक्रमित आहे याचा अचुक अंदाज CT स्कॅन मशीनच्या HRCT रिपोर्ट द्वारे मिळतो.

सध्या YCM हॉस्पिटलमध्ये खाजगी कंपनीच्या मालकीची CT स्कॅन मशीन कार्यरत असून खाजगी कंपनी रुग्णाकडून CT स्कॅनचा खर्च वसून करीत आहे. आमदार निधीतून CT स्कॅन मशीन मिळाल्यामुळे शहरातील रुग्नांचा खर्च वाचणार आहे. YCM मध्ये CT स्कॅन करणारी कंपनी शहरातील नागरिकांची लुबाडणूक करण्यासाठी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्य डोक्यातून कुशाग्र बुद्धीने पेरलेले बीज मनपाचे व सामान्य जनतेचे शोषण करीत आहे. याठिकाणी स्कॅनसाठी १२०० ते ५००० रुपये आकारणी करण्यात येते. स्कॅनचा खर्च रुग्णास करावा लागतो. आमदार बनसोडे यांनी नागरिकांची गरज ओळखून CT स्कॅनच्या गोंडस नावाखाली रुग्णांची होणारी लुट रोखन्यासासाठी दिलेलं CT स्कॅन मशीन भविष्यात खूप उपयोगी पडणार असून रुग्णाचे स्कॅन मोफत होणार असल्याने दिलास मिळणार आहे.

शहरातील जम्बो कोविड रुग्णालय व ऑटो क्लस्टर रुग्नालय ही रुग्णालये फुल्ल असून कोविड ग्रस्त नागरिकांना बेड मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांच्या अडचणी वाढल्या असून मनपाने युद्ध पातळीवर व्हेंटीलेटर्स बेड आणि ऑक्सिजन बेड्स निर्माणकरून रुग्णांची सोय करावी अशी मागणीही आमदार बनसोडे यांनी केली आहे. शहरातील प्रत्येक नागरिकाचा जीव महत्वाचा असून कोणताही रुग्ण उपचार न मिळाल्याने दगावू नये अशी भावना व्यक्त केली. एकूणच आमदार बनसोडे यांचा, रुग्णांची तातडीची गरज व भविष्याचा अचूक वेध घेऊन आमदार निधीचा वापर करून YCM रुग्णालयात CT स्कॅन मशीन उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव नावाजण्या सारखा आहे.

प्रतिक्रिया देताना बनसोडे म्हणाले, प्रशासन झटून काम करीत आहे. आरोग्य यंत्रणा विस्कळीत होण्याच्या मार्गावर आहे. आरोग्य कर्मचारी जीव धोक्यात घालून सेवा देत आहे. लॉक डाऊनच्या काळात नागरिकांनी घराबाहेर पडून नये शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, प्रत्येक नागरिकाने खबरदारी घ्यावी, लक्षणे असल्यास तात्काळ उपचार घ्यावेत, वेळे उपचार घेतल्यास रुग्ण बरा होतो परंतू नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन बनसोडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *