नितीन गडकरींची शिष्टाई यशस्वी ; महाराष्ट्राला 300 व्हेंटिलेटर्स देण्याचा जगनमोहन रेड्डींची घोषणा,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि.23 एप्रिल। नागपूर । नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीसंदर्भात आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. त्याचर्चेनंतर जगनमोहन रेड्डी यांनी महाराष्ट्राला 300 व्हेंटिलेटर्स देण्याची घोषणा केल्याची माहिती नितीन गडकरी यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या संकटाच्या परिस्थिती आंध्र प्रदेश महाराष्ट्राच्या मदतीला धावला आहे. महाराष्ट्राला मदत करावी अशी विनंती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांना केली होती. जगनमोहन रेड्डी यांनी महाराष्ट्राला 300 व्हेंटिलेटर्स देण्याची घोषणा केली. (Andhra Pradesh CM Y S Jagan Mohan Reddy announces that they will send 300 Ventilators to Maharashtra after discussion with Nitin Gadkari )

महाराष्ट्र आणि नागपूरमधील रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रयत्न केले होते . कोविड’वरील उपचारासाठी आवश्यक ‘रेमडेसिव्हीर’ इंजेक्शनचा पुरवठा नागपूर आणि महाराष्ट्रात वाढवण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मायलन ‘व्हिटारीस इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रंजनीश बोंमजाई यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली होती. नितीन गडकरी यांच्या चर्चेनंतर नागपूरला चार हजार इंजेक्शन पाठवण्यात मिळाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *