महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि.२४ एप्रिल। मुंबई । ओमप्रकाश भांगे । केंद्र सरकारच्या ‘कोरोना वॉरियर्स’या वेबसाइटवर देशातील कोरोना योद्ध्यांची राज्यनिहाय यादी आणि संख्या दिलेली आहे. या यादीत पॅरामेडिकल शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांपासून वरिष्ठ डॉक्टर, सरकारी अधिकारी, कर्मचारी, विविध विभाग, संस्था, व्यक्तींचा समावेश आहे. देशभरात सर्व राज्यांतून एक कोटी ५८ लाख ५० हजार ३०० तर महाराष्ट्रातील १४ लाख ९६ हजार २९० कोरोना योद्ध्यांचा यादीत समावेश आहे. मात्र राजकीय क्षेत्रातील एकाचाही त्यात समावेश नाही.
सध्या महाराष्टातच नव्हे तर देशात ऑक्सिजन, लस, व्हेंटिलेटर, दवाखान्यात बेड, रेमडेसिविर, मिळत नाही मिळत नाही. त्यातून रुग्ण गंभीर होत आहेत, काही दगावताहेत. प्रशासन व आरोग्य यंत्रणांवर ताण येत आहे. अशा काळात रुग्णांना मदत मिळवून देण्यासाठी कोरोना योद्धे म्हणून लोकप्रतिनिधींना जबाबदारी दिली असती तर वेगळे चित्र दिसले असते, असे मत व्यक्त होत आहे.
देशभरात आमदार, खासदार मिळून चार हजार ८९६ इतके लोकप्रतिनिधी आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थाचे लोकप्रतिनिधी लाखोंच्या घरात आहेत. त्यातील काहीजण कोविड काळात चांगले काम करीतही आहेत, पण बहुतांश लोकप्रतिनिधी,पुढारी राजकीय हे कोरोनाच्या कार्यापासून दूरच आहेत.
राज्यातील कोविड योद्धे
डॉक्टर १,४५,८५४
विद्यार्थी १६,९००
नर्स १,२३,७९७
दंतवैद्य ३१.७१७
फार्मासिस्ट २,३३,३२२
आयुष १,५४,७१३
लॅब व्हेलेंटरी ५,४१८
निवृत्त नोकरदार ३,४३२
नेहरू युवा केंद्र विद्यार्थी १,३,६८९
एनएसएस व एनसीसी २,९०,०००
आशा वर्कर्स ७२,८९५
अंगणवाडी १,९८,७८६
होम गार्ड १,०८,६९४
संस्था १४,९५४