रेल्वेचा दोन महिन्यांचा प्लान तयार, प्रवाशांना होणार नाही त्रास

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी ।नवीदिल्ली । दि.२६ एप्रिल ।देशात कोरोनाचा हाहाकार (Coronavirus) दिसून येत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. (Corona Pandemic) शहरांमधील लोक मोठ्या संख्येने आपल्या घरी परतत आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासना अधिक गतीमान झाले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे वाढत्या घटनांमध्ये वाढ होत आहे. रेल्वे प्रवाशांची संख्याही वाढली आहे. हे पाहता रेल्वेने पुढील दोन महिन्यांसाठी आराखडा तयार केला आहे.

वास्तविक, देशव्यापी लॉकडाऊन आणि अनेक लोकांचे काम गमावण्याच्या भीतीने, स्थलांतरित मजूर मोठ्या संख्येने स्थलांतर करीत आहेत. दरम्यान, एप्रिल आणि मे महिन्यासाठी रेल्वेने 330 जादा गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला असून त्यामध्ये 674 अतिरिक्त फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. ज्या ठिकाणी जास्त मागणी आहे अशा मार्गावर रेल्वेची सेवा वाढविण्यात येणार आहे. सध्या भारतीय रेल्वेमार्फत 1514 विशेष गाड्या चालविण्यात येत आहेत. 5387 उप-शहरी गाड्याही चालविण्यात येत आहेत. क्लोन ट्रेन म्हणून रेल्वेकडून 984 प्रवासी गाड्या आणि 28 विशेष गाड्या रेल्वेमार्फत चालवल्या जात आहेत.

रेल्वेमार्गावर जाहीर झालेल्या 330 जादा गाड्यांपैकी 143 गाड्या मध्य रेल्वेने चालवल्या असून याच्या 377 फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वे 154 अतिरिक्त गाड्या चालवणार याच्या 212 फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. उत्तर रेल्वेकडून 27 गाड्या धावतील ज्या 27 फेऱ्या होतील. पूर्व रेल्वेच्या दोन गाड्यांच्या माध्यमातून चार फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. ईशान्य रेल्वेमध्ये 9 रेल्वे सोडणार आहे. याच्या 14 ट्रिप्स होतील. उत्तर मध्य रेल्वेकडून एकच रेल्वे चालविण्यात येणार आहे. याच्या दहा फेऱ्या होणार आहेत. दक्षिण पश्चिम रेल्वे तीन गाड्या सोडणार असून 30 फेऱ्या चालविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना यावेळी काही प्रमाणात त्रास होणार नाही, अशी रेल्वेने सेवा सुरु केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *