विश्वासूचे अध्यक्ष शंकरराव नांदेडकरांच्या प्रयत्नातून बसस्थानकात पाणपोईचा प्रारंभ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी ।संजीवकुमार गायकवाड । नांदेड । दि.२६ एप्रिल । विश्वासू प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शंकरराव नांदेडकर यांच्या विशेष प्रयत्नातून येथील मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाश्यांसाठी पाणपोईचे उदघाटन अध्यक्ष शंकरराव नांदेडकर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.नांदेड़ शहरात दुकाने बंद असल्या मुळे व उन्हाळ्यात प्रवासी यांना थण्ड पाणी पिण्यासाठी वाटर कूलर ची व्यवस्ता करण्यात आली यावेळी,आगार प्रमुख पुरुषोत्तम व्यवहारे,नगरसेवक प्रतिनिधि संतोष मोरे,विश्वासू प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष कृष्णा उमरीकर,सचिव सौ.ललिता कुंभार,सदस्य रमाकांत घोणसीकर,बालाजी पवार, हरजिंदर सिंघ संधू,बालाजी पाशावार,संजीवकुमार गायकवाड यांच्यासह रा.प.महामंडळाचे कर्मचारी उपस्थित होते.प्रवाश्यांच्या गैरसोयी दूर करण्यासाठी सतत प्रयत्नरत राहणारे विश्वासू प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शंकरराव नांदेडकर यांनी बसस्थानकात प्रवाश्यांना पाण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. विश्वासू प्रवासी संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा करुन अध्यक्ष शंकरराव नांदेडकर यांनी बसस्थानकात पुलाखालील मोठा खड्डा बुजवून सीमेंट रस्ता करुन घेतला प्रवाश्यांना होणारा त्रास दूर केल्याने प्रवाशांत आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *