जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीच्या वापरास अमेरिकेची पुन्हा मंजुरी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी ।वॉशिंग्टन । दि.२६ एप्रिल । शुक्रवारी अमेरिकन आरोग्य नियामक मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीच्या वापरास पुन्हा परवानगी दिली आहे. जॉन्सन अँड जॉन्सनची लस घेतल्यानंतर सहा महिलांच्या रक्तामध्ये गाठी तयार झाल्याची तक्रार आल्यानंतर या लसीच्या वापरावर अमेरिकेने तात्पुरती स्थगिती आणली होती. या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येणार असल्याचे अमेरिकेच्या सेन्टर फॉर डिसीज कन्ट्रोल आणि फूड अॅन्ड ड्रग अॅडमिनीस्ट्रेशनच्या संयुक्त निवेदनात सांगण्यात आले होते.

शुक्रवारी बोलताना अमेरिकेच्या आरोग्य नियामक मंडळाने सांगितले की, जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीचा पुन्हा वापर सुरु होऊ शकतो. लसीकरणानंतर रक्तामध्ये गाठी तयार होत असल्याच्या चिंतेमुळे लसीकरण अभियान थांबवण्यात आले होते. तसेच लसीच्या वापरावरही स्थगिती आणली होती. 14 एप्रिल रोजी लसीच्या वापरावर स्थगिती आणण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. स्थगिती उठवण्याची शिफारस एका विशेषतज्ज्ञांच्या पॅनलने केली आहे. कारण व्हॅक्सिनचे फायदे नुकसानापेक्षा अधिक असल्याचे दिसून आले आहे.

फूड अॅन्ड ड्रग अॅडमिनीस्ट्रेशनचे प्रमुख जनेट वुडकॉक यांनी सेंटर फॉर डिसीज कन्ट्रोल अँड प्रिवेंशनसोबत संयुक्त प्रतिक्रिया देताना सांगितले की, या निष्कर्षावर आम्ही पोहोचलो आहोत की, कोरोना व्हॅक्सिनचे संभाव्य फायदे त्यांच्या नुकसानापेक्षा 18 वर्षांवरील लोकांमध्ये जास्त दिसून आले. सीडीसी प्रमुख रोशेन वालेन्सकी यांनी सांगितले की, रक्ताच्या गाठी फारच कमी लोकांमध्ये तयार झाल्याचे दिसून आले होते. तसेच पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, नियामक लसींवर संशोधन सुरु आहे. शुक्रवारी सादर करण्यात आलेल्या डेटानुसार, जॉन्सन अँड जॉन्सनची कोविड-19 लस घेणारी 3.9 मिलियन महिलांपैकी 15 जणांना गंभीर ब्लड क्लॉट्सचा सामना करावा लागला आणि तीन जणांचा मृत्यू झाला.

केवळ रक्ताच्या गाठीच तयार होत नाहीत तर सोबत रक्तातील प्लेटलेट्सही जॉन्सन अँड जॉन्सन ची लस घेतल्यानंतर कमी होत असल्याची तक्रार आली आहे आणि हे खूप धोकादायक असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. जॉन्सन अँड जॉन्सनच्या 68 लाख लसींचे डोस अमेरिकेत देण्यात आले असून आतापर्यंत अशा प्रकारची कोणतीही तक्रार आली नाही.

जॉन्सन अँड जॉन्सनच्या लसीच्या वापरावर या घटनेनंतर तात्पुरती स्थगिती आणण्यात आली होती. पण अमेरिकेच्या लसीकरणाच्या कार्यक्रमावर या स्थगितीचा परिणाम होणार नसून मॉडर्ना आणि फायझर या इतर दोन लसींचा वापर सुरूच राहिल, असे फूड अॅन्ड ड्रग अॅडमिनीस्ट्रेशनने स्पष्ट केल्यामुळे या तक्रारींची पूर्ण चौकशी करण्यात येईल आणि त्यानंतरच या लसीचा वापर करायचा की नाही याबद्दल निर्णय घेण्यात येईल, असे फूड अॅन्ड ड्रग अॅडमिनीस्ट्रेशनच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *