व्हॉट्स अ‍ॅप चे नवीन फिचर ; 24 तासांनंतर मेसेज आपोआप गायब होणार;

Spread the love

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि.२७ एप्रिल। मुंबई । व्हॉट्स अ‍ॅपने आता एक नवीन फिचर समाविष्ट केले आहे. फेसबुकचा मालकी हक्क असलेल्या या इस्टंट मेसेजिंग अ‍ॅपवर आता 24 तासांत मेसेज आपोआप डिलीट होणार आहेत. नवीन फिचर अ‍ॅण्ड्रॉईड(Android), आयओएस(IOS) तसेच वेब(Web)वरही काम करणार आहे. व्हॉट्स अ‍ॅपवर नवनवीन मेसेजेस, तसेच विविध ग्रुप्सवरील मेसेजचा मोठा खच साचतो, मग हे अनावश्यक मेसेज डिलीट करण्यावर आपला बराच वेळ वाया जातो. नव्या फिचरमुळे व्हॉट्स अ‍ॅप युजर्सचा वेळ वाचणार आहे. (WhatsApp message will disappear automatically after 24 hours; know about new features)

WABetaInfo वेबसाइटच्या वृत्तानुसार व्हॉट्सअॅप आधीपासून सुरू असलेल्या 7 दिवसात आपोआप मॅसेज गायब होणारा पर्याय बंद करणार नाही, तर यातच युजर्सला नवीन पर्याय उपलब्ध करुन देईल. आपण 7 दिवसाचा किंवा 24 तासांचा पर्याय निवडू शकता. म्हणजे वापरकर्त्यांकडे दोन्ही पर्याय असतील. WABetaInfo ने एक स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये 24 तासात मॅसेज गायब करण्याचे इनेबल आणि डिसेबल असे दोन पर्याय असतील.

यापूर्वी, व्हॉट्सअॅपने केवळ ग्रुप अॅडमिनला डिसअपेयरिंग मॅसेजसचे नियंत्रण दिले होते. मात्र आता ग्रुपमधील सर्व सदस्यांना मॅसेज सेटिंग बदलण्याचा अधिकार देखील देण्यात आला आहे. अँड्रॉईड आणि आयओएस दोन्हीमध्ये फोटो आपोआप गायब होण्यासाठी व्हॉट्सअॅप चाचणी घेत आहे.

व्हॉट्सअॅप (WhatsApp) युजर्ससाठी लवकरच नवीन फिचर आणण्याच्या तयारीत आहे, ज्यामध्ये व्हॉईस नोटवर प्लेबॅक स्पीड (playback speed) बदलता येणार आहे. तथापि असे फिचर गेल्या महिन्यात स्पॉट केले गेले होते. WAbetaInfo नुसार अँड्रॉईडच्या बीटा चॅनलमध्ये तीन प्लेबॅक स्पीड अॅड करण्यात आले आहे, ज्यामध्ये 1x, 1.5x आणि 2x समाविष्ट आहे. (WhatsApp message will disappear automatically after 24 hours; know about new features)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *