केंद्र सरकारकडून सिरम आणि भारत बायोटेकला निर्देश ; कोरोना लसीची किंमत कमी करा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि.२७ एप्रिल। नवी दिल्ली । कोरोना लसींच्या किंमतीवरून राज्यांकडून होणाऱ्या टीकेच्या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने सिरम (Serum) आणि भारत बायोटेक (Bharat Biotech ) या दोन कंपन्यांशी चर्चा सुरु केली आहे. केंद्र सरकारने या दोन्ही कंपन्यांना लसीचा दर कमी करण्यासंदर्भात विचारणा केली आहे. (Central govt asks Serum Bharat Biotech to cut vaccine prices)

1 मेपासून 18 ते 45 गटातील नागरिकांसाठीही लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. या लसीकरणासाठी 50 टक्के लसींचा साठा हा राज्यांनी सिरम आणि भारत बायोटेककडून थेट विकत घ्यावा, अशी अट केंद्र सरकारने घातली होती. त्यानंतर भारत बायोटेक आणि सिरमने राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांसाठी आपले दर जाहीर केले होते.

त्यानुसार भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस राज्य सरकारला 600 रुपये आणि खासगी रुग्णालयांना 1200 रुपयांत विकली जाणार आहे. तर सिरमच्या कोविशील्ड लसीसाठी हा दर अनुक्रमे 400 आणि 600 रुपये इतका आहे.

मात्र, या दोन्ही कंपन्यांनी केंद्र सरकारला याच लसी अवघ्या 150 रुपयांना विकल्या होत्या. त्यामुळे अनेक राज्यांनी सिरम आणि बायोटेकच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. संकटाच्या काळात या दोन्ही कंपन्या नफेखोरी करत असल्याचा आरोपही राज्यांनी केला होता. त्यामुळे आता केंद्र सरकारने हा वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेऊन दोन्ही कंपन्यांशी चर्चा सुरु केली आहे. तेव्हा आता सिरम आणि भारत बायोटेक या दोन्ही कंपन्या लसींची किंमत कमी करणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *