कोव्हिड रुग्णालयात रुग्णांच्या भेटीसाठी गर्दी, नातेवाईकांवर थेट गुन्हे नोंदवण्याचा इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि.२७ एप्रिल। नाशिक । नाशिकमधील कोव्हिड रुग्णालयात रुग्णांच्या भेटीसाठी जाणाऱ्या नातेवाईकांवर गुन्हे नोंदवण्याचा इशारा देण्यात आला आहे. रुग्णांच्या भेटीसाठी गर्दी करणाऱ्या नातेवाईकांना आवरण्यासाठी महापालिका आयुक्तांनी कडक कारवाईचा इशारा दिला आहे. (Nashik Municipal Commissioner warns to file FIR against relatives gathering to meet COVID Patient)

कोरोनाग्रस्त रुग्णांना जेवण देण्याच्या बहाण्याने किंवा इतर कारणांसाठी नातेवाईक येऊन भेटतात. हेच नातेवाईक शहरात सुपर स्प्रेडर ठरतात. नातेवाईक शहरात फिरत असल्याने कोरोना संसर्ग वाढत असल्याचा निष्कर्ष महापालिकेने काढला आहे. नाशिकमध्ये कोरोना संसर्ग वाढत असून रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.

सुरुवातीला एक हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. मात्र दंड करुनही ऐकले नाही तर थेट गुन्हे दाखल केले जावेत, असे आदेश नाशिक महापालिका आयुक्तांनी काढले आहेत. नाशिक शहरातील डॉ. झाकीर हुसैन, बिटको रुग्णालयांत कोरोना बाधित रुग्णांना भेटण्यासाठी नातेवाईक गर्दी करत असल्याचं वारंवार समोर येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *