मिस्टर ३६० , डिव्हिलियर्स नवा विक्रम, अनेक दिग्गजांना मागे टाकत गाठलं अव्वल स्थान

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । निखिल गाडे । दि.२८ एप्रिल। मुंबई । एबी डिव्हिलियर्स याने आयपीएलमध्ये एक नवा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. जगातील सर्वात उत्कृष्ट खेळाडूंमध्ये एबी डिव्हिलियर्सचं नाव घेतलं जातं. मैदानाच्या चारही बाजुला शॉर्ट खेळणारा तो खेळाडू आहे. एबीने दिल्लीविरुद्ध वेगवान डाव खेळला आणि 42 बॉलमध्ये नाबाद 75 धावा केल्या. त्याच्या खेळीदरम्यान एबीने 5 सिक्स आणि 3 चौकारही लगावले. या खेळीच्या जोरावर आरसीबीची धावसंख्या 20 ओव्हरमध्ये 5 विकेटवर 171 अशी झाली.

एबी डिव्हिलियर्सने आयपीएलमध्ये आपले 5000 धावा पूर्ण केले आणि यासाठी त्याने 3288 बॉलचा सामना केला. अशी कामगिरी यापूर्वी डेव्हिड वॉर्नरने आयपीएलमध्ये केली होती. वॉर्नरने या लीगमध्ये 3555 बॉलमध्ये 5000 धावा पूर्ण केल्या आहेत. आता एबीने वॉर्नरला मागे टाकले असून तो पहिल्या क्रमांकावर आला आहे.

आयपीएलमध्ये सर्वात कमी बॉलचा सामना करीत 5000 धावा ठोकणारे अव्वल फलंदाज

3288 बॉल – एबी डिव्हिलियर्स

3555 बॉल – डेव्हिड वॉर्नर

3615 बॉल- सुरेश रैना

3817 चेंडू- रोहित शर्मा

3824 चेंडू- विराट कोहली

3956 बॉल – शिखर धवन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *