कोव्हिड काळात पाकिस्तानची वाटचाल उपासमारीकडे ; सरकारकडे 15 ते 20 दिवस पुरेल इतकाच गहू शिल्लक

Spread the love

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी ।अजय सिंग । दि.२८ एप्रिल। नवीदिल्ली । कोरोना व्हायरस काळात (Coronavirus Pandemic) अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलं आहे. पाकिस्तानात देखील अशीच काहीशी परिस्थिती आहे. अशावेळी देखील पाकिस्तानने भारतातील कोरोनाची परिस्थिती पाहता मदत करण्याचं जाहीर केलं होतं. पाकिस्तान व्हेंटिलेटर्ससह काही आणखी काही आवश्यक गोष्टी भारताला पुरवण्याची तयारी दर्शवली होती. पण पाकिस्तानमध्ये परिस्थिती वेगळी आहे. कोव्हिड काळात धक्कादायक बाब म्हणजे पाकिस्तानची वाटचाल उपासमारीकडे होऊ लागली आहे. इम्रान खान सरकारकडे केवळ तीन आठवडे पुरेल एवढाच गव्हाचा साठा शिल्लक आहे. पाकिस्तानचे अर्थमंत्री शौकत तरीन यांनी सोमवारी अशी माहिती दिली आहे की पाकिस्तानला 60 लाख मेट्रिक टन गहू रिझर्व्ह करण्याची आवश्यकता आहे.

एक्सप्रेस ट्रिब्यून नॅशनल प्राइस मॉनिटरिंग कमिटी (NPMC) च्या बैठकीत तरीन यांनी माहिती दिली आहे की गेल्या आठवड्यापर्यंत पाकिस्तानकडे केवळ 6,47,687 टन गहू शिल्लक होता. गव्हाचा सध्याचा वापर लक्षात घेता शिल्लक साठा जवळपास अडीच आठवड्यांपर्यंत पुरेल असंही ते म्हणाले. मनीकंट्रोलने याबाबत वृत्त दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *