कोरोना व्हायरस ; आणखी किती लाटा येणार, सांगू शकत नाही ; तात्याराव लहाने

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि.३० एप्रिल । कोरोनाच्या (CoronaVirus) दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. राज्यात कोरोना बाधिताचा आकडा काही कमी होण्याचे नाव घेत नाहीय. मृतांचा आकडादेखील वाढला आहे. यावर टास्क फोर्सच्या सदस्यांनी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविल्याने खळबळ उडाली आहे. वैद्यकीय शिक्षण संचालनलयाचे संचालक तात्याराव लहाने यांनी यावर भाष्य केले आहे. (Cant Predict how many waves of corona will come in future: Tatyarao Lahane)

साथ रोगांमध्ये व्हायरसची ताकद सतत वाढत असते. व्हायरस आपल्यात बदल करत असतो. यामुळे कोरोनाच्या आणखी किती लाटा येतील हे आज सांगू शकत नाही. कितीही लाटा आल्या तरीही महाराष्ट्र खंबीर आहे. पुरेशी तयारी आहे. कोरोनाविरोधात लढण्यासाठी आपण तयारी केली आहे, असे लहाने म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *