महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पुणे । दि.३० एप्रिल । देशामध्ये कोरोनाच्या प्रभावात गेल्या वर्षीच्या मध्यापासून प्रभावीत झालेली सोन्याची मागणी पुन्हा काही प्रमाणात सुधारत असल्याचे पहावयास मिळत आहे. यामध्ये जानेवारी ते मार्च 2021 च्या दरम्यान देशात 140 टन सोने आयात करण्यात आले आहे. एक वर्षाच्या अगोदर समान तिमाहीच्या तुलनेत सोने आयात ही 37 टक्क्यांनी वाढली आहे. जानेवारी ते मार्च 2020 मध्ये 102 टन सोने आयात करण्यात आले आहे. वर्ल्ड गोल्ड काउंसिल यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.
मागणी वाढण्याची कारणे ;
# जानेवारी-मार्च तिमाहीत सोन्याची किंमत सरासरी ४७,१३१ रु. प्रति १० ग्रॅम राहिली, जी ऑक्टोबर-डिसेंबरच्या तुलनेत ६% कमी आहे.
# ऑगस्ट,२०२० च्या तुलनेत ही किंमत १६% कमी आहे. देशांतर्गत बाजारात सोने ५६,००० रु. प्रति १० ग्रॅमच्या उच्च पातळीवर होते.
# यादरम्यान देशात कोविड बचावासाठी सरकारकडून लसीकरणाची सुरू झाली आणि लग्नसराई सुरू झाली.
# गेल्या लॉकडाऊनमुळे जे दागिने खरेदी करू शकले नाहीत, त्यांनी ऑगस्टनंतर केली खरेदी.
जागतिक सोने मागणीत घसरण जानेवारी ते मार्च 2021 च्या दरम्यान जागतिक सोने मागणीत 23 टक्क्यांची घसरण राहिली आहे. या कालावधीत 815.7 टन सोने मागणी राहिली आहे. वर्षाच्या अगोदर मागणी 1059.9 टन राहिली होती.