महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पुणे । दि.३० एप्रिल । देशात सलग तिसर्या वर्षी यंदाही मान्सून जोरदार बरसण्याचा अंदाज असून त्याचे आगमन केरळमध्ये वेळेवरच म्हणजे 1 जून रोजी होण्याची शक्यता असल्याचा अंदाज आशिया खंडातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातही मान्सून 7 ते 8 जून रोजी दाखल होण्याची शक्यता आहे.
दोन दिवसांपूर्वी 26 व 27 मे रोजी दक्षिण आशिया देशातील हवामान तज्ज्ञांचे ऑनलाईन चर्चासत्र पार पडले. यात भारतासह जपान, कोरियासह सात देश सहभागी झाले होते. यात सर्व देशांच्या तज्ज्ञांनी यंदाचा मान्सून आपापल्या देशात कसा असेल तसेच दक्षिण आशिया भागावर याचा कसा परिणाम होईल याबाबत आपली मते मांडली. सर्व देशांतील तज्ज्ञांच्या मते यंदा मान्सून लवकर येईल आणि सामान्यपेक्षा चांगला पडेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.