बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती उत्तम, रुग्णालयातून डिस्चार्ज !

Spread the love

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि.३ मे । बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते, दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून रविवारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती त्यांची पत्नी अभिनेत्री सायरा बानो यांनी दिली आहे.

98 वर्षीय अभिनेते दिलीप कुमार यांना अस्वस्थ वाटू लागल्याने शुक्रवारी दुपारी खार येथील हिंदुजा रुग्णालयामध्ये दाखल केले होते. दिलीप कुमार यांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना सायरा बानो म्हणाल्या, ‘दिलीप साब यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा आणि काही चाचण्या करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता.

दोन दिवसांनंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांची प्रकृती आता उत्तम आहे. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करा.’ तत्पूर्वी त्यांचे काwटुंबिक मित्र फैसल फारुखी म्हणाले, ‘वय जास्त असल्यामुळे दिलीप साब यांना रूटीन चेकअपसाठी अधूनमधून रुग्णालयात घेऊन जावे लागते. घाबरण्याचे काहीही कारण नाही. ते ठीक आहेत.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *