महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पिंपरी । दि. ८ मे । म्हाडा मोरवाडी: पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य विभाग वायसीएमएच झोन अंतर्गत रिव्हरडेल हौसिंग सोसायटी येथे नागरिकांची मोफत करोना अँन्टीजन रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्यात ८५ नागरिकांच्या टेस्ट घेण्यात आल्या आयोजन श्री दिपक भोजने श्री स्वप्नील ठाकुर श्री विलास रंदील यांनी केले श्री दिपक भोजने व स्वप्नील ठाकुर, यांनी म्हाडा मोरवाडीतील जास्तीत जास्त नागरिकांनी करोना चाचणी करून घ्याव्यात असे नागरिकांना आवाहन केले गोकर्ण मित्र मंडळ , आरंभ सोशल फाउंडेशन, दिपक भोजने मित्र परिवार, रिव्हरडेल हौसिंग सोसायटीचे नंदकुमार देशमुख, राजेंद्र जोशी,सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर क्षीरसागर, रजनीकांत गायकवाड , पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य विभाग वायसीएमएच झोन यांचे सहकार्य लाभले.