पुढील आठवडय़ात निर्णय ;15 मे नंतरही कडक निर्बंध वाढवण्याचे संकेत,

Spread the love

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि. ९ मे । राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा पॉझिटिव्हिटी दर कमी होत आहे. मात्र काही जिल्ह्यांत कोरोनाची रुगणसंख्या वाढताना दिसत आहे. अशा जिल्ह्यांमध्ये कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन वाढवायचा अथवा नाही याबाबत 15 मेनंतरच निर्णय घेण्यात येईल, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज स्पष्ट केले.

‘राज्यात रुग्णांची रोजची संख्या 60 ते 65 हजारांच्या आसपास आहे. अद्याप राज्याचा पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला नाही. राज्यातील 12 जिह्यात पॉझिटिव्हीटी दर कमी होत आहे. तर काही जिल्हय़ांत हा दर स्थिर आहे. काही जिह्यांत कोरोनाचा वाढता दर दिसत आहे. त्या ठिकाणी कडक लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन वाढवायचा की नाही याचा निर्णय 15 मेनंतरच घेण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *