महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ मे । पिंपरी चिंचवड । कोरोनाची तिसरी लाट येणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. या लाटेमध्ये सर्वाधिक धोका हा लहान मुलांना आहे. पुढचा टप्प्यात मुलांमध्ये कोरोना जास्त पसरू शकतो. अशी बातमी ऐकून आपण अधिकच घाबरून गेलो आहोत पण मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे हा आजार घाबरण्याचा किंवा काळजी करण्याचा नसून काळजी घेण्याचा आहे ,या बद्दल महाराष्ट्र २४ शी बोलतांना वैद्य निलेश लोंढे यांनी पुढील माहिती दिली.
सर्वात महत्वाचे या आजारात महत्व आहे ते प्रतिकार शक्तीला .कोरोना जरी झाला तर ८५ % लोकांना काही त्रास होत नाही याचे कारण प्रतिकार शक्तीला ,तर प्रतिकार शक्ती कश्यावर अवलम्बुन आहे तर ती तुमच्या पाचनशक्ती ,पाचनशक्ती साठी आपला आहार ,व्यायाम व झोप खूप महत्त्वाची आहे ,
लहान मुलांची दिनचर्या कशी असावी व काय खाऊ नये
लहान मुलांची दिनचर्या खालील प्रमाणे :
✅ सकाळी लवकर उठावे
✅ उठल्यावर आयुर्वेदिक दंतमंजनाने दात घासावे .
✅ निर्विकार कवल चूर्ण टाकून पाण्याने गुळण्या करा
✅ जिव्हा निर्लेखन ने जीभ स्वच्छ घासा
✅ लाकडी घाणा तीळ तैलाने मालिश करा
✅ घाम निघेल असा व्यायाम करा सूर्यनमस्कार ,सांध्यांच्या हालचाली ,कवायती योगासने
✅ कोमट पाण्याने अंघोळ करा
✅ अंघोळ करताना मसूर डाळ हळद यांचा वापर करावा
✅ दिवा तीळ तैल वापरून दिवा लावावा
✅ ओवा ,वेखंड ,बाळंतशेपा ,वावडिंग ,देशी गाईच्या शेणाच्या गोवऱ्या ,भीमसेनी कापूर ( निर्विकार धुरीचे साहित्य ) वापरून धुरी कराव्या
✅ ओंकार ,मेडिटेशन ,विश्वप्रार्थना म्हणावी
✅ सकाळी नाष्ट्या ऐवजी जेवण भाजी पोळी तूप सॅलड ( गाजर ,मुळा ,बीट )
✅ दुपारी भूक लागल्यास डाळ भात तूप लिंबू आमसूल ओली हळद
✅ संध्याकाळी भूक लागल्यास फळे व ड्राय फ्रुटस
✅ रात्री ७ वा भाजी भाकरी १ घास ३२ वेळा चावून खावा .दर घासाला घोटभर पाणी
✅ रात्री ८ नंतर टिव्ही मोबाईल व डोळ्यावर प्रखर प्रकाश पडेल अश्या गोष्टी बंद कराव्या
✅ जेवणानंतर दंतमंजन व गुळण्या करणे
✅ शरीराचा विचार करून सकाळी उपाशीपोटी दूध तूप ( कफाचा त्रास ,अपचन असणाऱ्यानी घेऊ नये )
✅ रात्री झोपताना कानात तीळ तैल ,नाकात साजूक तूप ,डोळ्यात तूप ,तळहात तळपाय टाळू ला तूप लावावे
✅ १० वाजता झोपताना देवाचे नामस्मरण
लहान मुलांना काय देऊ नये
❎ प्रोटिन पावडर ,चोको ,कुरकुरे, केक, बिस्किट ,
❎ चॉकलेट सॅण्डविच, पिझ्झा, बर्गर चायनीज,
❎ उसाचा रस, बर्फ, आइस्क्रिम .
❎ आंबवलेले. बाहेरचे. शिळे ,उघडयावरचे
❎ शेव, फरसाण, .
❎ नाष्ट्याला ओटस, कॉनफ्लेक्स ,उपीट ,पोहे ,चहाचपाती ,दुधचपाती ,दुधभात ,चहाबिस्किट ,चहा व खारी व वेकरी
❎ दुध व बोर्नविटा ,बूस्ट ,हॉर्लिकस , मिल्क शेक ,शिकरण ,मॅगी. इडली ,डोसा ,ढोकळा (इन्स्टन्ट बनवलेले सुध्दा ) ,समोस ,वडा, भजी, भेळ मिसळ घेवु नये
❎ सॉस, जॅम. देऊ नये
आपली इम्म्युनिटी कशी आहे हे जाणून घेण्यासाठी आमचा इम्म्युनिटी स्कॉर हा फॉर्म भरावा
https://forms.gle/RzJVKzoFADaRC3tcA
अत्यंत कमी इम्म्युनिटी असणाऱ्या बालकांसाठी विशेष ऑनलाईन तपासणी सुविधा उपलब्ध संपर्क 7447476686
लहान मुलांसाठी निर्विकार स्पेशल इम्म्युनिटी किट पार्सल , कुरियर ( भारतात कुठेही ) ,होम डिलिव्हरी सेवा उपलब्ध
वैद्य निलेश लोंढ़े
एम ड़ी आयुर्वेद
जय गणेश साम्राज्य भोसरी
😃 स्वस्थ रहा मस्त रहा 😃
निर्विकार आरोग्य मित्र
एक पाउल निर्विकार राहण्यासाठी व निर्विकार होण्यासाठी
निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल
बी विंग जय गणेश साम्राज्य
भोसरी पुणे