पंजाब किंग्सचा कर्णधार केएल राहुल, तब्येतीबाबत दिली Update

Spread the love

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि. १३ मे । टीम इंडियाचा बॅट्समन आणि आयपीएलच्या पंजाब किंग्सचा कर्णधार केएल राहुल याला पोटाच्या दुखापतीमुळे आयपीएल अर्ध्यातच सोडावी लागली होती. सुरुवातीला औषधं घेतल्यानंतरही केएल राहुलची पोटदुखी कमी झाली नाही, अखेर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयामध्ये चाचणी केल्यानंतर त्याला अपेंडिकटिस झाल्याचं समोर आलं, यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर आता केएल राहुलने त्याच्या तब्येतीबाबत माहिती दिली आहे. (KL Rahul/Instagram)

केएल राहुलने शस्त्रक्रियनेनंतर त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक फोटो शेयर केला आहे. दुखापत बरी होत असल्याचं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे.. केएल राहुलने शस्त्रक्रियनेनंतर त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक फोटो शेयर केला आहे. दुखापत बरी होत असल्याचं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे. या फोटोमध्ये केएल राहुल त्याच्या कुत्र्यासोबत फिरताना दिसत आहे.

केएल राहुल याची इंग्लंड दौऱ्यासाठीच्या टीममध्ये निवड झाली आहे, पण त्याला फिटनेस टेस्ट पास करावी लागणार आहे. इंग्लंडमध्ये भारतीय टीम न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल खेळेल, यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच टेस्ट मॅचची सीरिज होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *