Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
Gold Price Today: अक्षय्य तृतीयेदिवशी उतरलं सोनं,पाहा नवा दर - Maharashtra 24

Gold Price Today: अक्षय्य तृतीयेदिवशी उतरलं सोनं,पाहा नवा दर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि. १४ मे । अक्षय्य तृतीयेच्या (Akshaya Tritiya 2021) शुभ मुहूर्तावर सोन्याच्या किंमतीमध्ये (Gold Rates Today) घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. आज 14 मे रोजी सोनं स्वस्त झालं आहे. आज सोन्याच्या किंमतीत 73 रुपयांची घसरण झाली आहे. यानंतर तुम्ही सोनं 47365 रुपये प्रति तोळा या दराने खरेदी करू शकता. एमसीएक्सवर (Multi Commodity Exchange MCX) जूनच्या डिलिव्हरीचे दर 70 रुपयांच्या घसरणीने सुरू झाले होते. सुरुवातील झालेली घसरण आज MCX वर कायम होती, यामध्ये सुधारणा झाली नाही.

सकाळी 10.15 वाजण्याच्या सुमारास 73 रुपये अर्थात 0.15 टक्क्यांच्या घसरणीनंतर सोन्याचे दर 47365 रुपये प्रति तोळावर ट्रेड करत होते. आधीच्या सत्रात हे दर 47438 रुपयांवर बंद झाले होते. आज मार्केट उघडताना सोन्याचे दर 47368 रुपये होते. आज सकाळी सोन्याच्या दराने 47343 रुपये ही निचांकी 47400 रुपये ही उच्चतम पातळी गाठली होती. ऑगस्टच्या डिलिव्हरीचं सोनं देखील 47869 रुपये प्रति तोळावर ट्रेड करत होतं.

आज चांदीच्या दरातही (Silver Price Today) घसरण पाहायला मिळाली आहे. सकाळी दहा वाजता जुलैच्या डिलिव्हरीचे चांदीचे दर 103 रुपये प्रति किलोने कमी झाले आहेत. या घसरणीनंतर चांदी 70370 रुपये प्रति किलोवर ट्रेड करत होती. सप्टेंबरच्या डिलिव्हरीच्या चांदीमध्ये देखील 87 रुपयांची घसरण होऊन दर 71515 रुपयांवर ट्रेड होत होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *