व्हॉट्सॲप कॉलिंग, व्हिडिओ कॉलिंग बंद होणार ?

Spread the love

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि. १६ मे । सोशल मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपची प्रायव्हेट पॉलिसी स्वीकारण्याची मुदत शनिवारी संपली असून यापुढे जे वापरकर्ते पॉलिसी स्वीकारणार नाहीत त्यांच्यावर निर्बंध आणले जाणार आहेत. यातील पहिला टप्पा म्हणजे व्हिडिओ आणि ऑडिओ कॉलिंग बंद होणार आहे.

फेसबुकच्या मालकीचे असलेल्या व्हॉट्स ॲपने प्रायव्हेट पॉलिसी आणल्यानंतर यूजर्समध्ये असंतोष आहे. त्यामुळे याविरोधशत हायकोर्ट, सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाने या पॉलिसीची विस्तृत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. जर्मनीमध्ये दोन दिवसांपूर्वी ही पॉलिसी स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. या पॉलिसीला विरोध असतानाही फेसबुक इंक आपल्या भूमिकेवर ठाक आहे. कोर्ट आणि आयोगाने दिलेल्या तंबीनंतर व्हॉट्स ॲप थेट अकाऊंट डिलिट करण्याऐवजी हळू हळू सेवा बंद करण्यावर भर देणार आहे. यातून वापरकर्त्यांवर दबाव आणला जात आहे. भारतात ५३ कोटींहून अधिक व्हॉट्स ॲपचे वापरकर्ते आहेत.

शनिवारी हायकोर्टात झालेल्या सुनवाणीत व्हॉट्स ॲपच्या वकिलांनी आपल्या प्रायव्हेट पॉलिसीचे समर्थन केले. आम्ही या माध्यमातून वापरकर्त्यावर कुठलाही दबाव टाकू इच्छित नाही, असे सांगत कायदेशीररित्या आम्ही कुठल्याही ग्राहकाला सेवा देण्यास बांधील नसल्याचे सांगितले. ग्राहक हा प्लॅटफॉर्म सोडू शकतात. ही पॉलीसी कुणाच्याही खासगी जीवनात ढवळाढवळ करणार नाही, अशी ग्वाही कंपनीने दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *