इंग्लंडच्या आयपीएल खेळाडूंना कसोटी मालिका हुकण्याची शक्यता

 16 total views

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि. १६ मे । आयपीएल क्रिकेट स्पर्धेत सहभागी झालेल्या इंग्लंडच्या क्रिकेटपटूंना 2 जूनपासून लॉर्डस् मैदानावर सुरू होणाऱया न्यूझीलंडविरूद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका हुकण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

कोरोना महामारीच्या दुसऱया लाटेने भारतातील परिस्थिती चिंताजनक झाल्याने 2021 ची आयपीएल क्रिकेट स्पर्धा बेमुदत कालावधीसाठी तहकूब करावी लागली. या स्पर्धेत सहभागी झालेल्या इंग्लंडच्या क्रिकेटपटूंना काही कालावधीकरिता विश्रांती देण्याचा इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाचा विचार आहे. इंग्लंडचे क्रिकेटपटू ख्रिस वोक्स्, सॅम करेन, मोईन अली, बटलर आणि बेअरस्टो हे आयपीएल क्रिकेट स्पर्धेत सहभागी झाले होते. इंग्लंडच्या या क्रिकेटपटूंनी स्पर्धेतील किमान एक सामना खेळला आहे.

आता या क्रिकेटपटूंना मायदेशी दाखल झाल्यानंतर 10 दिवस आयसोलेशनमध्ये राहावे लागेल. त्यांचा क्वॉरंटाईनचा कालावधी चालू आठवडय़ाअखेर संपणार आहे. त्यामुळे इंग्लंडच्या या खेळाडूंना न्यूझीलंडविरूद्धच्या कसोटी मालिकेत खेळविण्याची घाई इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळातर्फे केली जाणार नाही, असे बीबीसीच्या अहवालात म्हटले आहे. न्यूझीलंडविरूद्ध कसोटी मालिकेसाठी इंग्लंडच्या संघामध्ये काही नव्या चेहऱयांना संधी दिली जाईल, असे इंग्लंड संघाचे व्यवस्थापक संचालक गिलेस यांनी यापूर्वी सुचित केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *