अफुपेक्षा वाईट आहे ही नशा

 84 total views

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि. १६ मे । एखाद्या व्यक्तीला दारू पिण्याची सवय असेल आणि ती सुटत नसेल तर आपण त्याला दारूच्या आहारी गेलेला ऍडिक्टिव्ह असे म्हणतो आणि दारूचे ऍडिक्शन एवढे वाईट असते की, तो माणूस मेल्या-शिवाय ती सवय सुटत नाही. आपण दारूची अशी बदनामी करतो खरी, पण दारूपेक्षा साखरेची नशा वाईट असते. ती सुटतही नाही आणि कोणत्याही मादक द्रव्याइतकेच तिचे परिणाम सुद्धा वाईट असतात. स्निग्ध पदार्थ शरीरासाठी घातक असतात असे समजले जाते. परंतु स्निग्ध पदार्थाइतकीच साखर सुद्धा घातक असते. ऑस्ट्रेलियात करण्यात आलेल्या एका पाहणीमध्ये तसे आढळून आले आहे.

तेलगट, तुपकट पदार्थ खाल्ल्याने जाडी वाढते हे खरेच आहे, पण साखरेने सुद्धा काही कमी जाडी वाढत नाही. साखर खाणार्‍यांची सुद्धा पोट सुटते आणि साखरेमुळे अनेक विकार बळावतात. साखर खाण्याची सवय असणार्‍या व्यक्तीची साखर सुटत नाही. ती दारूसारखीच व्यसन होऊन बसते. मेलबोर्नच्या आहार तज्ज्ञ जॅक्वेलीन अल विल यांनी हे निरीक्षण नोंदले आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये साखर खाण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. देशाच्या वाढत चाललेल्या जाडीमध्ये साखरेचा सिंहाचा वाटा आहे. ऑस्ट्रेलियन लोक दरसाल सरासरी ५३ किलो साखर खातात. हेच प्रमाण दररोज २९ चमचे असे पडते. या वाढत्या सवयीचे परिणाम तपासत असताना जॅक्वेलीन अल विल यांना असे आढळले की, मधुमेह आणि हृदयविकारासारख्या रोगांस साखर सुद्धा जबाबदार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *