शेअर बाजारात तेजी ; सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला,

Spread the love

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि. १७ मे । बड्या कोर्पोरेट्सच्या आर्थिक निकालांकडे डोळे लावून बसलेल्या गुंतवणूकदारांनी आज सकाळीच खरेदीचा सपाटा लावला आहे. आज सोमवारी बाजार उघडताच सेन्सेक्सने ३०० अंकांची झेप घेतली. निफ्टी ९० अंकांनी वधारला आहे.

आजच्या सत्रात गुंतवणूकदारांनी एफएमसीजी आणि बँकिंग क्षेत्रात खरेदीचा ओघ सुरु ठेवला आहे. तर फार्मा कंपन्या आणि मेटल कंपन्यांच्या शेअरवर विक्रीचा दबाव आहे.निफ्टीवर इंडसइंड बँक, एसबीआय, आयसीआयसीआय बँक, अदानी पोर्ट या शेअरमध्ये वाढ झाली आहे. तर एल अँड टी, सिप्ला, भारती एअरटेल, एनटीपीसी आणि टायटन या शेअरमध्ये घसरण झाली आहे.

आज भारती एअरटेल, ग्लॅन्ड फार्मा, कोलगेट पामोलिव्ह, फेडरल बँक, वॅबको इंडिया , थ्रीआय इन्फोटेक या कंपन्यांची आर्थिक आकडेवारी जाहीर होणार आहे. शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार शुक्रवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी बाजारात २६०८ कोटींची विक्री केली. तर स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ६१३ कोटींचे शेअर खरेदी केले. गेल्या दोन आठवड्यात भांडवली बाजारात झालेल्या पडझडीत परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणुऊक काढून घेतल्याचे समोर आले आहे. मे महिन्यात आतापर्यंत परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ६४२७ कोटी काढून घेतले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *