पिंपरी चिंचवडमध्ये म्युकरमायकोसिसचा धोका वाढला, दोन दिवसात 70 रुग्ण दाखल

Spread the love

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि. १७ मे । राज्यात कोरोना रुग्णांमध्ये आता म्युकरमायकोसिसचा धोका वाढलाय. राज्यातील अनेक भागात म्युकरमायकोसिसचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातही म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळले आहेत. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात या आजारामुळे 12 रुग्ण दगावले आहेत. तर दोन दिवसात 70 रुग्ण दाखल झाले आहेत. यशवंतराव चव्हाण रुग्णालयात रोज 3 रुग्णांवर शस्त्रक्रिया केली जात आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी रुग्णालयांमध्येही म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत. (70 patients of Mucormycosis, 16 die at Yashwantrao Chavan Hospital)

म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी या आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. शहरातील सर्वात मोठ्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या 12 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेनं दिलीय. तर दोन दिवसांत 70 रुग्ण रुग्णालयात दाखल झाले आहेत. पिंपरी-चिंचवडमधील खासगी रुग्णालयांमध्येही म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मात्र, महापालिकेकडे नेमके किती खासगी रुग्णालयं आहेत, याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

अशा रुग्णांच्या नाकाची एंडोस्कोपी करावी
म्युकरमायकोसिस या आजाराची लक्षणे प्रामुख्याने मधुमेहग्रस्त व्यक्तीला कोरोना होऊन गेल्यानंतर काही दिवसांनी दिसून येतात. त्यामुळे हा आजार वेळीच टाळायचा असेल तर अशा रुग्णाची वेळच्या वेळी साखरेची पातळी चेक करायला हवी, असं मत राज्याचे कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी व्यक्त केलं. तसेच जे रुग्ण 21 दिवसांहून जास्त काळ रुग्णालयात राहून गेले आहेत, अशा रुग्णांच्या नाकाची एंडोस्कोपी करावी, अशी सूचना त्यांनी मांडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *