‘पहिले ऑनलाईन कलावंत जन आंदोलन’

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी ।लक्ष्मण रोकडे । दि. १७ मे । एस के आर्ट प्रोडक्शनचे संस्थापक शिवा बागुल, आयोजित पहिले ऑनलाइन कलावंत जनआंदोलन दिनांक 16 मे 2021 रोजी दुपारी २:३० वाजता ऑनलाईन माध्यमातून करण्यात आले. यात महाराष्ट्रातील कलाकारांच्या 35 संघटना, निर्माते, दिग्दर्शक, पत्रकार, जेष्ठ अभिनेते विजय पाटकर, मिलिंद दास्ताने व भोसरी विधान सभेचे आमदार महेश दादा लांडगे उपस्थित होते. हे आंदोलन google meet वरून यु ट्यूब व काही डिजिटल पोर्टल वर live केले होते.

या आंदोलनाची प्रस्तावना आयोजक श्री शिवा बागुल सर, लेखक/दिग्दर्शक व एस के प्रोडक्शनचे संस्थापक यांनी केली. पहिल्या जनआंदोलनाचे प्रमुख म्हणून यांनी या आंदोलना मागचा उद्देश सर्वप्रथम मान्यवरांना व्यक्त केला. यात कलाकारांच्या अनेक समस्या आहेत. या समस्याना सर्वासमोर मांडल्या.
शिवा बागुल सरांनी त्यांचे विचार मांडताना सांगितले की कलाकार फक्त स्वतःसाठी जगत नसून तो इतरांसाठी एक जगण्याचा माध्यम आहे लोक डाऊनच्या काळात घरात आहेत, त्यावेळी कित्येक कलावंत रस्त्यावर उतरून इतरांना मदत करत आहेत.
शासनाने बऱ्याच लोकांना मदत केली आहे असं सांगत आहे परंतु त्याची कुठलीही नोंद किंवा किती लोकांना मदत पोहोचवली याबद्दल कुठेही काही लिहिलेलं नाहीये. यासाठी सर्व कलाकारांनी एकत्र येऊन शासनाकडे या गोष्टीची मागणी करायला हवी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *