कोरोना काळात सुपरस्टार रजनीकांतची सीएम फंडला भरघोस मदत

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । दि. १८ मे ।देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा हाहाकार सुरू आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांत वाढ होत आहे याचबरोबर मृतांचा आकडाही चिंताजनक बनत आहे. दरम्यान कोरोना काळात देशात सेलेब्रिटींकडून मोठ्या प्रमाणात गरजूंना मदत देण्यात येत आहे. साऊथ सुपरस्टार रजनीकांतने तामिळनाडू सीएम फंडसाठी मोठी मदत जाहीर केली आहे. रजनीकांतने तामिळनाडु सरकारला ५० लाखांची मदत केली आहे. रजनीकांतच्या मदतीने चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

दरम्यान रजनीकांत माध्यमांशी बोलत होते. नागरीकांनी नियमांचे पालन केल्यास कोरोना साखळीला तोडण्यास मोठ्या फायदा होणार आहे. घरी रहा सुरक्षीत रहा एवढच मी नागरीकांना आवाहन करू शकतो. मुख्यमंत्री स्टॅलिन यांना भेटत ५० लाखांचा चेक सुपूर्द केला. या दरम्यान कलानिधी मारन यांनीही तामिळनाडू सरकारला १० कोटींची मदत केली.

मुख्यमंत्री स्टॅलीन यांच्या नेतृत्वात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १३ सदस्यांची आमदार सल्लागार समिती नेमण्यात आली आहे. यासमितीचा अहवाल आम्ही जनतेसमोर ठेवणार असल्याचे तामिळनाडू सरकारने सांगितले. या समितीमध्ये विधानसभेतील सदस्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *