महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. १९ मे । आयपीएल 2021 पुढे ढकलल्यानंतर बहुतेक परदेशी खेळाडू मायदेशी परतले आहेत, परंतु ‘युनिव्हर्स बॉस’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या ख्रिस गेल अजूनही मालदीवमध्ये आहे.
कॅरिबियन क्रिकेटपटू ख्रिस गेलने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला असून, ‘स्कूबा डायव्हिंग इन द मालदीव’ असे कॅप्शन दिले आहे. व्हिडिओमध्ये गेल हिंद महासागरात विविध प्रकारचे मासे आणि कोरल रीफ्ससोबत पोहताना दिसत आहे. यासोबतच त्याने पुश-अप आणि समुद्राच्या तळाशी स्क्वॅट करत स्वॅग दाखवला.
https://www.instagram.com/chrisgayle333/?utm_source=ig_embed&ig_rid=c1801662-f82a-44dd-a7fe-4413ef35d357
ख्रिस गेल सोशल मीडियावर आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. युनिव्हर्स बॉस नेहमी वेगळ्या स्टाईलमध्ये दिसतो.