खुशखबर ! फक्त 50 रुपयांत आधारकार्ड मध्ये हवे तेवढे बदल करा

Spread the love

महाराष्ट्र २४ – नवी दिल्ली : भारतीयांना आधार कार्डने एक वेगळी ओळख दिली आहे. या आधारमध्ये बोटाचे ठसे, डोळ्यांचे रेटिना असल्याने हे ओळखपत्र खूप महत्वाचे मानले गेले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही अनेक ठिकाणी आधार बंधनकारक करण्यात आले आहे. आता युआयडीएआयने आधार कार्डधारकांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. फक्त ५० रुपयांत आधारमध्ये हवे तेवढे बदल करता येणार आहेत. 

आधार कार्डमध्ये पत्ता, नाव, जन्म तारीख, फोटो आदी बदलासाठी पैसे द्यावे लागतात. पत्ता बदलण्यासाठी 150 रुपयेही आकारले जात होते. यामुळे युआयडीएआयने ट्विट करून फीची माहिती दिली आहे. तसेच या बदलांसाठी जर कोणी तुमच्याकडे जास्त पैसे मागत असेल तर त्याची तक्रार तुम्ही टोल फ्री क्रमांक 4747 किंवा https://resident.uidai.gov.in/file-complaint ऑनलाईन करू शकता, असेही सांगितले आहे. 

आधार कार्ड रिप्रिंटसाठी 50 रुपये आकारले जातात. यामध्ये प्रिंट, स्पीड पोस्टाचा खर्च आणि जीएसटीची रक्कम असते. हे शुल्क तुम्ही ऑनलाईनही करू शकता. यासाठी नेट बँकिंग, डेबिट, क्रेडीट कार्ड आणि युपीआयही वापरू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *