महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० मे । भारतीय स्टेट बँकेने फार्मासिस्ट आणि डेटा ॲनालिस्ट ऑनलाईन भरती परीक्षा पुढे ढकलली आहे. देशातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. २३ मे रोजी ही परीक्षा होणार होती. दरम्यान या दोन्ही परीक्षांची पुढील तारीख जाहीर करून नियोजित वेळेत होणार आहे.
याबाबत एसबीआयकडून असे सांगण्यात आले की, कोरोनाचा देशभर हाहाकार माजला आहे. एसबीआयडून २३ मे रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार होत्या. ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली असल्या तरी लवकरच याची तारीख जाहीर होऊन नियोजित वेळेत होणार आहेत. याबाबत दिलेल्या नियमावलीमध्ये कोणताही बदल होणार नसल्याचे ही सांगण्यात आले आहे.
देशभरातील विविध राज्यांत लिपिक पदाच्या ६७ फार्मासिस्ट आणि अधिकारी पदाच्या ८ ॲनालिस्ट पदांवर भरतीसाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे. फार्मासिस्ट पदासाठी जास्तीत जास्त वयोमर्यादा ३० वर्षे आहे. यामध्ये लेखी परीक्षा व मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.
लेखी परीक्षा २०० गुणांची असेल, ज्यासाठी दोन तासांचा कालावधी देण्यात येईल. पेपरमध्ये जनरल अवेरनेस, जनरल इंग्लिश, क्वांटिटेटिव ॲप्टिट्यूड, रीझनिंग ॲबिलिटी आणि प्रोफेशनल नॉलेज असे प्रश्न असणार आहेत. अंतिम निकालात, ४० टक्के लेखी परीक्षा असेल आणि ६० टक्के मुलाखतीसाठी दिले जाणार आहेत.
डेटा ॲनालिस्ट पदासाठी कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे आहे. लेखी परीक्षा व मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. लेखी परीक्षा २२० गुणांची असेल, ज्यासाठी दिड तासांचा कालावधी देण्यात येतो. परीक्षेतील रिझनिंग ॲबिलिटी, क्वांटिटेटिव ॲप्टिट्यूड, जनरल इंग्लिश आणि प्रोफेशनल नॉलेजचे प्रश्न विचारले जातात. अंतिम निकालासाठी ७५ टक्के लेखी परीक्षा घेतली जाते तर मुलाखतीला २५ टक्के पाधान्य देण्यात येते. दरम्यान यात निवड झालेल्या उमेदवारांची निवड झालेल्यांना हैदराबादमध्ये प्रशिक्षणासाठी पाठवले जाते. यानंतर बँक निवडक उमेदवारांना भारतात कुठेही पाठवू शकते.