कर्नाटकच्या 22 वर्षीय रॅन्चो ने ई-कचऱ्यापासून तयार केले 600 ड्रोन्स

Spread the love

 महाराष्ट्र २४ – कर्नाटकच्या 22 वर्षीय एनएम प्रतापने आपल्या भन्नाट आयडियाने जगभरात भारताचे नाव रोषण केले आहे. प्रतापने ई-कचऱ्याद्वारे ड्रोन बनविण्याची कामगिरी केली आहे

प्रताप 14 वर्षांचा त्याने असताना सर्वात प्रथम ड्रोन पाहिला होता. त्यानंतर स्वतः ड्रोन चालवणे व रिपेअरिंग करण्यास शिकला. 16 वर्षांचा असताना त्याने आपला पहिला ड्रोन तयार केला. हे ड्रोन फोटो देखील काढू शकते. खास गोष्ट म्हणजे प्रतापने हा ड्रोन कचऱ्यापासून बनवला होता. प्रताप एका शेतकरी कुटुंबातून येतो. त्यामुळे तो नवीन सामान खरेदी करू शकत नाही. म्हणून त्याने जुन्या ई-कचऱ्याद्वारे ड्रोन बनविण्यास सुरुवात केली. वर्ष 2018 मध्ये जर्मनीमध्ये पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय ड्रोन एक्स्पोमध्ये त्याने अल्बर्ट आइंनस्टीन सुवर्ण पदक देखील जिंकले. 22 वर्षीय प्रतापने आयआयटी बॉम्बे आणि आयआयएससीमध्ये देखील लेक्चर दिले. सध्या तो डीआरडीओच्या एका प्रोजेक्टवर काम करत आहे. कर्नाटकमध्ये पुर आला असताना प्रतापच्या ड्रोन्सने मदत कार्यात लोकांना साथ दिली होती.

तुटलेले ड्रोन, मोटर, कॅपॅसिटर अशा ई-कचऱ्याद्वारे प्रताप ड्रोन तयार करतो. त्याने आतापर्यंत 600 पेक्षा अधिक ड्रोन्स तयार केले आहेत. प्रतापने हे सर्व स्वतः शिकले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *