टीव्ही पाहणे आता स्वस्त होणार

Spread the love

महाराष्ट्र २४- डीटीएच आणि केबल टीव्ही सब्सक्राइबर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. आता या सर्वांना केवळ १३० रुपयांत २०० चॅनेल पाहता येवू शकणार आहेत. टेलिकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार, TRAI (टेलिकॉम रेग्युरेटरी अॅथोरिटी ऑफ इंडिया) चा नॅशनल टेरिफ ऑर्डर २.० मध्ये मल्टी टीव्ही युजर्ससाठी एनसीएफ (नेटवर्क कॅपिसिटी फी) सह १३० रुपयात फ्री टू एअर चॅनेल दाखवण्याची सूचना केली आहे. तसेच आता युजर्संना ब्रॉडकास्टर्स आणि ऑपरेटर्सकडून डिस्काउंटही दिला जाणार आहे.

नव्या टेरिफ ऑर्डरच्या युजर्सच्या संख्येत आता डीटीएच आणि केबल टीव्ही सर्विसशी जोडणार आहे. त्यामुळे युजर्स पुन्हा एकदा त्यामुळे टेरिफ महाग झाल्यानंतर सब्सक्रिप्शनचे नुतनीकरण केले नव्हते. त्यामुळे अशी शक्यता वर्तवली जात होती की, नवीन राष्ट्रीय टेरिफ ऑर्डर नंतर टीव्ही सब्सक्रिप्शन १४ टक्के स्वस्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या वर्षीच्या नवीन टॅरिफ ऑर्डर आल्यानंतर युजर्सने तक्रारी केल्या होत्या. आता त्यांना सब्सक्रिप्शनसाठी आधीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागत होते. सुरुवातीला नेटवर्क कॅपिसिटी फी नव्हती. परंतु, युजर्सला प्रत्येक महिन्याला १५३ रुपये देणे बंधनकारक होते. म्हणूनच युजर्सला टीव्हीच्या बिलात दर महिन्याला २० टक्के जास्त रक्कम मोजावी लागत होती. तसेच युजर्सने नेटवर्क कॅपिसिटी फीला १०० रुपये कमी करण्याची मागणी केली होती.

युजर्सची समस्या लक्षात घेऊन ट्रायने आता निर्णय घेतला आहे. परंतु, नेटवर्क कॅपिसिटी फीला कमी करण्याऐवजी फ्री मध्ये मिळणाऱ्या चॅनेलच्या संख्येत वाढ केली आहे. आता १३० रुपयात दुप्पट चॅनेल दिसणार आहेत. आधी फक्त १०० चॅनेल दिसत होते. परंतु, आता ही संख्या २०० झाली आहे. नवीन टॅरिफ ऑर्डर १ मार्च २०२० पासून लागू होणार आहे. परंतु, या निर्णयाविरोधात ब्रॉडकास्टर्सने कोर्टात याचिका दाखल केली आहे. याची सुनावणी १२ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *