महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ मे । आपल्या आयुष्यातील या छोट्या-छोट्या गोष्टींचा आपल्या ग्रह आणि नक्षत्रांवर परिणाम होतो, हे आपल्याला कदाचित माहिती नसेल (Astro Tips Shoes Know How It Gets Affect Your Luck).आज आम्ही तुम्हाला बुटांसंबंधित काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्याचा तुमच्या आयुष्यावर मोठा परिणाम होतो.
# बऱ्याच वेळा मंदिरात किंवा धार्मिक ठिकाणी बुटं किंवा चपला चोरीला जातात. असे करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की चोरलेले बूट आणि चप्पल परिधान केल्याने आरोग्याचे आणि आर्थिक नुकसान होऊ शकते.
# वास्तुनुसार बूट आणि चपलांना दक्षिण, नैऋत्य, वायव्य, पश्चिम दिशेने ठेवणे शुभ मानले जाते. या दिशेने शू रॅक ठेवा. घराच्या प्रवेशद्वारासमोर आणि पायऱ्यांच्या कोपऱ्यात शू-रॅक ठेवणे अशुभ मानले जाते.
# वास्तुशास्त्रानुसार घराच्या कोपऱ्यात बुटं आणि मोजे फेकणे शुभ नसते. यामुळे आयुष्यात तुम्हाला यश मिळणार नाही. तसेच पैसे आणि संपत्ती देखील कमी होते.# जर एखादी व्यक्ती फाटलेले जुने बूट किंवा चपला परिधान करुन रोजगार किंवा नोकरीच्या शोधात गेली तर त्याला यश मिळत नाही.
# ज्योतिष शास्त्रानुसार, कधीही भेट म्हणून बुटं किवा चपला घेऊ किंवा देऊ नये. ही बुटं घातल्याने शनिदेव तुमच्या कामात अडचणी निर्माण करतात आणि तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपयश प्रप्त होते.
# पिवळ्या रंगाचे शूज परिधान करण्यास मनाई आहे. कारण पिवळ्या रंग भगवान बृहस्पतिचा रंग आहे. हिंदू धर्मात पिवळ्या रंगाला अतिशय शुभ मानले जाते. पिवळ्या रंगाचे शूज आणि सोन्याच्या पैंजण परिधान केल्याने घरात गरिबी येते.
# ज्योतिषशास्त्रज्ञांच्या मते, शरीराची खालचे स्थान शनिचे असते. ज्या लोकांचे शनि आणि राहू प्रामुख्याने प्रभावी आहेत त्यांना बुटांच्या व्यापारात प्रगती मिळते. म्हणून काळे, निळे आणि तपकिरी रंगाचे बुटं घालणे शुभ मानले जाते.