या देशात उरलेली IPL खेळवण्यास BCCI उत्सुक, समोर आलं कारण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ मे । कोरोना व्हायरसमुळे यंदाच्या वर्षाची आयपीएल (IPL 2021) स्पर्धा अर्ध्यातच स्थगित करावी लागली. यानंतर आता उरलेले 31 सामने खेळवण्यासाठी बीसीसीआय (BCCI) प्रयत्नशील आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संशय असल्यामुळे बीसीसीआय आयपीएलच्या उरलेल्या मॅच भारतात आयोजित करू इच्छित नाही. बीसीसीआयचे अंतरिम सीईओ हेमांग अमीन (Hemang Amin) यांनी आयपीएलच्या उरलेल्या सामन्यांसाठी दोन वेळापत्रकं तयार केली आहेत. ही दोन वेळापत्रकं युएई (UAE) आणि इंग्लंड (England) ही ठिकाणं लक्षात घेऊन बनवण्यात आली आहेत. 29 मे रोजी बीसीसीआयच्या स्पेशल एजीएमचं आयजोन करण्यात आलं आहे. या बैठकीत अमीन इंग्लंड आणि युएईचा प्रस्ताव ठेवतील. या दोन ठिकाणांचा प्रस्ताव ठेवण्यात येणार असला तरी अमीन यांची पहिली पसंती युएईला आहे. उरलेल्या आयपीएलसाठी सप्टेंबर-ऑक्टोबर मधला कालावधी ठरवला जात आहे.

मागच्या वर्षी कोरोना व्हायरसमुळे आयपीएलचा 13 वा मोसम युएईमध्ये आयोजित करण्यात आला होता. याची जबाबदारीही अमीन यांच्या खांद्यावरच होती. आयपीएलच्या सफल आयोजनामुळे फ्रॅन्चायजी, बोर्ड आणि आयपीएलशी जोडल्या गेलेल्या अनेकांनी हेमांग अमीन यांचं कौतुक केलं होतं.

टाईम्स ऑफ इंडियामध्ये आलेल्या वृत्तानुसार हेमांग अमीन स्पेशल एजीएममध्ये आयपीएल इंग्लंड आणि युएईमध्ये खेळवण्याचा प्रस्ताव ठेवतील, पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमीन युएईमध्येच आयपीएल खेळवण्यासाठी आग्रही आहेत. युएईमध्ये आयपीएल खेळवण्यासाठी तीन कारणं समोर आली आहेत. यामध्ये युएईला आयपीएल खेळवण्याचा अनुभव, सप्टेंबर-ऑक्टोबरमधलं तिथलं वातावरण आणि इंग्लंडच्या तुलनेत कमी होणारा खर्च ही प्रमुख कारणं समोर आली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *