रॉयल एन्फील्डचा मोठा निर्णय, 7 देशातील तब्बल इतक्या बुलेट परत मागवल्या

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २२ मे । रॉयल एनफील्डने (Royal Enfield) भारत, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, फिलीपिन्स, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या सात देशांमधून संयुक्तपणे मीटिओर 350 (Royal Enfield Meteor 350), क्लासिक 350 (Royal Enfield Classic 350) आणि बुलेट 350 (Royal Enfield Bullet 350) या मोटारसायकलींचे 236,966 युनिट्स रिकॉल केले (वाहनं परत मागवली आहेत) आहेत. कंपनीचे म्हणणे आहे की, इग्निशन कॉइलमध्ये (Ignition Coil) संभाव्य बिघाड असू शकतो, ज्यामुळे काही प्रकरणांमध्ये इंजिनमध्ये बिघाड, बाईकचा परफॉर्मन्स कमी होणे किंवा इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट होण्याची शक्यता असते. त्यामुळे कंपनीने रिकॉलचा निर्णय घेतला आहे. (Royal Enfield to recall over 2.36 lakh units of Meteor 350, Bullet 350 and Classic 350)

रॉयल एनफील्ड कंपनीने म्हटले आहे की, हा दोष नियमित अंतर्गत चाचणी दरम्यान (परीक्षणादरम्यान) आढळला होता आणि हा मुद्दा स्पष्टपणे ओळखला आहे. परत मागवलेल्या बाईक्स डिसेंबर 2020 ते एप्रिल 2021 दरम्यान तयार करण्यात आल्या होत्या. यामध्ये मीटिओर 350 बाईकचादेखील समावेश आहे. डिसेंबर 2020 ते एप्रिल 2021 दरम्यान तयार केलेल्या मीटिओर 350 बाईक परत मागवल्या आहेत. तर जानेवारी ते एप्रिल 2021 दरम्यान तयार केलेल्या आणि विकल्या गेलेल्या क्लासिक 350 आणि बुलेट 350 बाईक्स कंपनीने परत मागवल्या आहेत.

रॉयल एनफील्ड कंपनीने म्हटले आहे की, सर्व मोटारसायकलींमध्ये हा दोष आढळणार नाही, या काळात तयार करण्यात आलेल्या काहीच मोटारसायकलींमध्ये असा दोष आढळेल. परंतु कंपनीचे सुरक्षिततेचे नियम आणि खबरदारीच्या उपाययोजना पाहता सर्व मॉडेल्स रिकॉल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *