‘आप’ गाठू शकतो बहुमताचा आकडा, ओपिनिअन पोलद्वारे वृत्तवाहिनीचा अंदाज

Spread the love

महाराष्ट्र २४- दिल्ली विधानसभेची निवडणूक 8 फेब्रुवारीला होणार आहे. या निवडणुकीसाठीचा प्रचार गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता थांबणार आहे. या निवडणुकीमध्ये सत्ताधारी आप आणि भाजप यांच्यात प्रमुख लढत बघायला मिळते आहे. या दोन्ही पक्षाप्रमाणेच काँग्रेस आणि अपक्षांनी प्रचारत पूर्ण जोर लावलेला आहे. मतदार कोणाच्या पारड्यात आपले दान टाकतात याकडे या राजकीय पक्षांचे लक्ष लागलेले असून काही वृत्तवाहिन्यांनी निवडणूकपूर्व अंदाज प्रसिद्ध केलेला आहे.

एबीपी न्यूज या वृत्तवाहिनीने सी-वोटरसोबत मिळून केलेल्या सर्वेक्षणात आपला पुन्हा सत्ता मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र ‘आप’ला यंदाच्या निवडणुकीत मोठा फटका बसणार असून त्यांच्या जागा बऱ्याच मोठ्या प्रमाणात घटणार आहे. या ओपिनिअन पोलमध्ये म्हटलंय की ‘आप’ला झालेल्या नुकसानाचा फायदा भाजपला होणार असून त्यांच्या जागा लक्षणीय पद्धतीने वाढतील. असं असलं तरी भाजप सत्तेपर्यंत पोहचण्यात यशस्वी होणार नाही असं ओपिनिअन पोलमध्ये दिसते आहे. अपोनिअन पोलमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचा वर्तवण्यात आलेला अंदाज काय आहे ते पाहूयात

  • आप- 42 ते 56
  • बीजेपी- 10 ते 24
  • काँग्रेस- 0 ते 4

या आकड्यांवर नजर टाकल्यास काँग्रेसला याही निवडणुकीत मोठ्या निराशेचा सामना करावा लागेल असं चित्र बघायला मिळू शकतं असा अंदाज लावला जात आहे. दिल्ली विधानसभेच्या एकूण 70 जागा असून 2015 साली झालेल्या निवडणुकीमध्ये आपने यातल्या 67 जागांवर विजय मिळवला होता. उरलेल्या तीन जागा या भाजपला मिळाल्या होत्या. काँग्रेसला गेल्या निवडणुकीत एकही जागा     मिळवता आली नव्हती.

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 8 फेब्रुवारीला मतदान होणार असून 11 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. यंदाच्या निवडणुकीत 672 उमेदवार रिंगणात असून 148 उमेदवार हे अपक्ष आहेत. आपने सगळ्या जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत तर काँग्रेस आणि भाजपने प्रत्येक 66 जागांवर उमेदवार दिले आहेत. बसपा 68 जागावर लढते आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसने 5 जागांवर आपले उमेदवार दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *