महाराष्ट्र २४ । ऑनलाईन । दि. २३ मे ।पंतप्रधान सुरक्षा वीमा योजना (Pradhan Mantri Suraksha Bima Yojana) ही एक अशी योजना आहे, ज्या अंतर्गत अपघाती मृत्यू आणि विकलांग झाल्यास इन्शुरन्स सेवा दिली जाते. हा एका वर्षाचा कव्हर आहे, जो संबंधित व्यक्तीद्वारे दरवर्षी रिन्यू केला जातो. ज्यांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे त्यांच्या खात्यातून याच्या प्रीमियमचे 12 रुपये आपोआप कापले जातील, अर्थात ऑटो डेबिट होतील. साधारण 25 मे ते 31 मे दरम्यान हे पैसे कापले जातात.
कोरोना काळात (Coronavirus Pandemic) आरोग्य वीमा, जीवन सुरक्षा वीमा असणं अत्यंत आवश्यक ठरत आहे. अनेकांच्या फायद्याच्या या योजना ठरल्या आहेत. अशीच एक योजना आहे ती म्हणजे पंतप्रधान सुरक्षा वीमा योजना. या योजनेअंतर्गत प्रीमियम कपातीसंदर्भात बँकांकडून ग्राहकांना मेसेज पाठवला जात आहे. शिवाय अन्य काही कम्यूनिकेशन मार्गांच्या साहाय्याने देखील बचत खातेधारकांना (Savings account) बँकांकडून सूचना दिल्या जात आहेत.
पंतप्रधान सुरक्षा वीमा योजनेत ज्यांनी नावनोंदणी केली आहे त्यांच्याच बँक खात्यातून पैसे डेबिट केले जाईल. पीएमएसबीवाय योजनेसाठी बँकेत अर्ज करून किंवा बँकेच्या नेटबँकिंगवर लॉग इन करून ऑनलाईन अर्ज करता येतो.
वार्षिक प्रीमियम 12 रुपये
पीएमएसबीवायचा कव्हरेज कालावधी दरवर्षी 1 जून ते 31 मे दरम्यान असतो. जर तुम्हाला ही योजना सुरू ठेवायची असेल तर रिन्युअल प्रीमियम मे महिन्यात भरला जाईल. पीएमएसबीवायचा वार्षिक प्रीमियम फक्त 12 रुपये आहे. तुम्हाला हा प्रीमियम मे महिन्याच्या शेवटी द्यावा लागेल. ही रक्कम 31 मेपर्यंत तुमच्या बँक खात्यातून आपोआप वजा केली जाते. जर तुम्ही ही योजना घेतली असाल तर बँक खात्यात शिल्लक ठेवणे आवश्यक आहे.
PMSBY योजनेचा लाभा 18 ते 70 वयोगटातील व्यक्ती घेऊ शकतात. पॉलिसी खरेदी करतानाच तुमचे बँक खाते या योजनेशी लिंक केले जाते, त्यामुळे प्रीमियम देखील आपोआप कापला जातो. पीएमएसबीवाय पॉलिसीनुसार वीमा खरेदी करणाऱ्या ग्राहकाचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा तो अपंग झाल्यास 2 लाखापर्यंतची रक्कम त्याच्यावर अवलंबून असणाऱ्यास मिळते.
वीम्याची रक्कम क्लेम करण्याआधी नॉमिनी किंवा संबंधित व्यक्तीला त्या बँक किंवा इन्शुरन्स कंपनीकडे जावे लागेल ज्यांच्याकडून तुम्ही वीमा खरेदी केला आहे. याठिकाणी तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल, यामध्ये नाव, पत्ता आणि फोन क्रमांक यांसारखी महत्त्वाची माहिती भरावी लागेल.